भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक सामन्याचे १६ लाखाचे तिकीट!

आता T20 विश्वचषक (T20 World Cup 2024) जवळ आला आहे, जगातील सर्व क्रिकेट चाहते 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यात होणाऱ्या बहुप्रतिक्षित सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघांनी गेल्या दशकात एकही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही, त्यामुळे दोन्ही देशांचे चाहते आयसीसी ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सामन्याबाबतही असेच काहीसे म्हणता येईल, दरम्यान, या सामन्याचे तिकीट वीस हजार डॉलरमध्ये (सुमारे १६.६ लाख रुपये) विकले जात असल्याचा आरोप आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी केला आहे. आणि यासाठी त्याने आयसीसीवर जोरदार टीका केली आहे.

मोदींनी थेट आयसीसीवरच प्रश्न उपस्थित केले असले तरी अलीकडेच असे अनेक अहवाल समोर आले आहेत ज्यात भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांचा काळेबाजार सुरु आहे आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे काळ्या बाजारात तिकिटाची किंमत 1 कोटींहून अधिक झाली. आणि असे असतानाही सामन्याच्या तिकिटावरून चाहत्यांमध्ये भांडणे सुरू आहेत. मात्र, मोदींच्या या आरोपावर आयसीसीने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.