बिग बॉसची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंतला अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राखीचे फोटो शेअर करताना एका सोशल मीडिया हँडलने (उमर संधू) राखीला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले आहे. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंत सध्या जुहू येथील ‘क्रिटी केअर हॉस्पिटल’च्या आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल आहे. तिच्यावर काही मोठ्या चाचण्या केल्या जात आहेत आणि कालही डॉक्टरांनी तिच्या काही चाचण्या केल्या होत्या. या सर्व चाचण्यांचे निकाल आल्यानंतरच राखीच्या आरोग्याबाबत योग्य माहिती उपलब्ध होईल. राखी पूर्णपणे तंदुरुस्त होईपर्यंत तिला रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
राखी सावंतला हृदयविकाराचा झटका! मुंबईच्या या रुग्णालयात सुरू आहेत उपचार
#RakhiSawant got Heart Attack!! She immediately hospitalised in Mumbai. Get well soon to her ! pic.twitter.com/E0pBAZgN8v
— Umair Sandhu (@UmairSandu) May 14, 2024
माध्यमांनी राखीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कळले की राखीचा फोन तिचा जवळचा मित्र रितेशकडे आहे. खरंतर, 14 मे 2024 रोजी छातीत दुखू लागल्याने राखीला तिच्या मैत्रिणींनी रुग्णालयात दाखल केले होते. टाइम्स नाऊला याची पुष्टी करताना राखीने सांगितले होते की तिला हृदयाचा त्रास आहे आणि त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिला पुढील 5-6 दिवस विश्रांतीची गरज आहे आणि या काळात ती कोणाशीही बोलू शकणार नाही. राखी, रितेश किंवा क्रिटी केअर हॉस्पिटलकडून हृदयविकाराच्या झटक्याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.
खुद्द राखी सावंत आणि तिच्या जवळच्या मैत्रिणीने या अभिनेत्रीला हृदयविकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचा दावा करत असले, तरी पण सोशल मीडिया वापरकर्त्यांना असे वाटते की राखीचे हॉस्पिटलायझेशन हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे. पापाराझी विरल भयानीच्या पोस्टच्या खाली कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, हॉस्पिटलमधील लोकांना देवाने धीर द्यावा, तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की- तिने हॉस्पिटलचा गणवेशही घातलेला नाही. तसेच ती रुग्णासारखी दिसत नाही. नक्कीच हा सगळा पब्लिसिटी स्टंट आहे.