रोहित शर्मा आणि अजित आगरकरची नव्हती ईच्छा, तरी देखील का करण्यात आली T20 वर्ल्डकप टीममध्ये हार्दिक पांड्याची निवड?


आग अद्याप विझलेली नाही, असे दिसत आहे. ही तीच आग आहे, मुंबई इंडियन्सच्या निर्णयामुळे लागली होती. जी रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात धगधगत आहे आणि ज्याची ठिगणी आता टीम इंडियाच्या T20 विश्वचषक 2024 मधील आकांक्षा पेटवू शकते. 2013 पासून आयसीसीचे जेतेपद पटकावण्याच्या त्यांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित होऊ शकतात. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांना हार्दिक पांड्या टी-20 वर्ल्ड कप संघात नको होता. आता प्रशिक्षक आणि निवडकर्त्यांना टीम हार्दिक नको असताना, हार्दिक टीममध्ये कसा आला? त्यामुळे त्यांच्या असे करण्यामागे एक कारण आहे.

T20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाच्या 15 खेळाडूंची निवड गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करण्यात आली होती. संघ निवड अहमदाबाद येथे झाली. आता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे लिहिले आहे की, हार्दिकची संघात निवड करण्यासाठी भारतीय निवड समितीची पसंती नव्हती. रोहित शर्मालाही त्याला संघात घ्यायचे नव्हते. प्रश्न असा आहे की, हार्दिक पांड्याची निवड का करण्यात आली? आणि केवळ निवडच नाही, तर त्याला टीम इंडियाचा उपकर्णधारही बनवण्यात आले. म्हणजेच टी-20 विश्वचषकात तो उपकर्णधार असेल. प्रशिक्षक आणि मुख्य निवडकर्त्यांच्या इच्छेशिवाय हे सर्व कसे शक्य होते?

सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, हार्दिक पांड्याला मोठ्या दबावामुळे संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच दबावाखाली त्याला टीम इंडियाचे उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. मात्र, भारतीय संघाचे निवडकर्ते आणि कर्णधार यांच्यावर कोणाचा दबाव होता? हे कळले नाही. आता सर्वात मोठी भीती अशी असेल की टी-20 वर्ल्ड कपमध्ये दडपणाखाली घेतलेल्या या निर्णयाचे परिणाम टीम इंडियाला भोगावे लागू शकतात?

बरं, आयपीएल 2024 दरम्यान बरेच काही पाहिले गेले आहे, ज्यावरून असे दिसते की रोहित आणि हार्दिकमध्ये सर्व काही ठीक नाही. ईडन गार्डन्सवर पावसादरम्यान केकेआरच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसोबत बसलेल्या रोहित शर्माचे फोटो असोत किंवा केकेआरचे फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर यांच्याशी गप्पा मारतानाचे फोटो असोत. याशिवाय, मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाने रोहितला हटवून हार्दिकला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतल्यापासून संघ दोन कॅम्पमध्ये विभागाला गेल्याच्या बातम्या येत आहेत.

एकूणच, रोहित-हार्दिकच्या अंतराचा परिणाम आयपीएल 2024 मध्ये दिसून येत आहे. 5 वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. आता हाच प्रकार T20 विश्वचषक 2024 मध्ये टीम इंडियासोबत झाला, तर भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं खऱ्या अर्थाने तुटतील.