गुरुचरण सिंगच्याबाबत मोठे अपडेट, तारक मेहताच्या सेटवर पोहोचले दिल्ली पोलिस, कलाकारांची केली चौकशी


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग बेपत्ता होऊन 3 आठवडे झाले आहेत. मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसांना कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत. काही दिवसांपूर्वी गुरुचरण सिंह यांचे वडील हरगीत सिंह यांनी मीडियासमोर आपली व्यथा मांडली होती आणि सांगितले होते की, मुलाच्या अनुपस्थितीमुळे त्यांचे कुटुंब खूप अस्वस्थ आहे. आता या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक मुंबईत पोहोचले असून त्यांनी तारक मेहताच्या सेटवर जाऊन कलाकारांची चौकशी केली आहे.

न्यूज 18 च्या वृत्तानुसार, अलीकडेच दिल्ली पोलीस अधिकारी मुंबईतील फिल्मसिटीमधील तारक मेहता का उल्टा चष्माच्या सेटवर पोहोचले आणि कलाकारांची चौकशीही केली. यावेळी पोलिसांनी गुरुचरण सिंग कुठे असू शकतो, याची चौकशी केली. विशेषत: गुरुचरण सिंग यांच्या जवळचे आणि त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांचीही पोलिसांनी चौकशी केली. यावेळी सर्वांनी उत्तम सहकार्य केले.

गुरुचरण सिंग प्रकरणाबद्दल बोलायचे झाले, तर हे प्रकरण तेव्हा सुरू झाले, जेव्हा त्याचे वडील हरगीत सिंग यांनी पोलिसात अभिनेता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलीस गुरुचरण सिंगचा शोध घेत होते, मात्र त्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही. आता या अभिनेत्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांना आणखी किती वेळ लागणार, हे पाहायचे आहे. गुरुचरण सिंग हा डिप्रेशनचा बळी असल्याचे यापूर्वी समोर आले होते. त्यानंतर हे अपडेट आले की तो आर्थिक संघर्ष करत होता. यानंतर, एक नवीन अपडेट समोर आले की तो लग्न करणार होता आणि म्हणूनच त्याने घर सोडले होते. अलीकडेच या प्रकरणातील एक नवीन अपडेट देखील समोर आले आहे की त्याला निवृत्त व्हायचे होते. एकप्रकारे गुरुचरण सिंग यांच्या बेपत्ता होण्याचे दिवस हळूहळू पुढे जात आहेत, खरे तर हे प्रकरण सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचे होत आहे.