कोण आहे अंशुल कंबोज, ज्याचे हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समधून केले पदार्पण ?


मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अंशुल कंबोजचे पदार्पण केले. 23 वर्षीय अंशुल हा हरियाणातील कर्नालचा रहिवासी आहे. पदार्पणाच्या सामन्याच्या दुसऱ्याच षटकात अंशुलने ट्रॅव्हिस हेडचा त्रिफळा उडवला होता. पण त्याचा तो चेंडू नो बॉल ठरला.

लिलावादरम्यान मुंबई इंडियन्सने त्याला 20 लाख रुपयांना खरेदी केले. या वर्षी मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणारा तो नमन धीरनंतरचा दुसरा खेळाडू आहे.

अंशुल कंबोज हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि हरियाणाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो भारताकडून अंडर-19 देखील खेळला आहे. अलीकडेच, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी केली आणि 10 सामन्यांत 17 बळी घेतले.

अंशुल कंबोजने 13 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 284 धावा केल्या आहेत आणि 24 बळीही घेतले आहेत. याशिवाय त्याने 15 लिस्ट ए सामन्यात 23 धावा देऊन 23 बळी घेतले आहेत आणि 9 टी-20 सामन्यात 22 धावा देत 11 बळी घेतले आहेत.