ही आहे जगातील सर्वात अनोखी दारु, ज्यामध्ये आहे अंतराळातून आलेले काहीतरी खास


जगात दारूचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत, जे लोकांना आवडतात. काही दारूच्या बाटल्या अगदी स्वस्तात मिळतात, तर काही इतक्या महागड्या असतात की करोडपतींनाही त्या विकत घेणे कठीण असते, कारण त्यांची किंमत करोडोंमध्ये असते. त्याचबरोबर अशा अनेक दारूच्या बाटल्याही पाहायला मिळतात, ज्या दुर्मिळ मानल्या जातात. अशीच एक दुर्मिळ दारू आजकाल खूप चर्चेत आहे, जिचे नाव आहे ‘शूटिंग स्टार वोडका’. या दारुचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अंतराळातून आलेल्या एका खास वस्तूचा समावेश करण्यात आला असून यामुळे ती थोडी वेगळी आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, या व्होडकामध्ये 1977 साली सापडलेल्या उल्कापिंडाच्या खडकातील मिश्रण मिसळले आहे. ही पहिली अल्ट्रा-प्रिमियम व्होडका असल्याचे म्हटले जाते, ज्यामध्ये स्पेस रॉक मिसळले गेले आहे, ज्यामुळे व्होडकाची चव अगदी खास बनली आहे. हे खास मद्य गेल्या शुक्रवारी अमेरिकेत पोहोचले आणि पेगासस डिस्टिलरीने बाजारात आणले. वास्तविक, पेगासस डिस्टिलरी हा एक प्रिमियम ऑरगॅनिक स्पिरिट ब्रँड आहे, जो 2021 मध्ये फ्रान्सच्या बरगंडी प्रदेशात स्थापित झाला होता आणि आकाशातील सर्वात मोठ्या नक्षत्रांपैकी एक म्हणून त्याचे नाव देण्यात आले होते.

शूटिंग स्टार व्होडका शुद्ध गहू आणि वनस्पतिजन्य पदार्थांपासून बनवले जाते. अहवालानुसार, हे करण्यासाठी, स्पिरीट एका महिन्याच्या कालावधीत 150 मीटर खाली असलेल्या विहिरीतील शुद्ध झऱ्याच्या पाण्याने पातळ केले जाते आणि इटलीमधील टेराकोटा ॲम्फोरेमध्ये किमान एक वर्ष ठेवले जाते.

खरं तर, ॲम्फोराच्या मध्यभागी एक उल्कापिंड टांगलेली आहे, जी व्होडकाला एक विलक्षण चव आणि पोत देते. त्याची चव जरा गोड असते असे म्हणतात. या अनोख्या दारूच्या आतापर्यंत फक्त 4,806 बाटल्या बनवल्या गेल्या आहेत, ज्याची किंमत 180 डॉलर्स म्हणजेच सुमारे 15 हजार रुपयांपांसून 200 डॉलर्स म्हणजेच सुमारे 16 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.