जे भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात कधीच घडले नाही, ते प्रभास-दीपिकाच्या कल्की 2898 मध्ये घडणार


पॅन इंडियाचा सुपरस्टार प्रभास आणि दीपिका पादुकोण स्टारर कल्की 2898 एडी या चित्रपटावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. चित्रपटाशी संबंधित अपडेट्स रोज समोर येत आहेत. त्याच वेळी, चाहत्यांमध्ये उत्साह द्विगुणित करण्यासाठी निर्माते स्टार्सचे लूक देखील शेअर करत आहेत. नुकतीच निर्मात्यांनी अमिताभ बच्चन यांची पहिली झलक दाखवून प्रेक्षकांना खूश केले होते. आतापर्यंत निर्माते याला सायन्स फिक्शन फिल्म म्हणून प्रमोट करत होते.

पण कल्की 2898 च्या पहिल्या झलकमध्ये अमिताभ बच्चन यांना अश्वत्थामाच्या रूपात पाहिल्यानंतर आता लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्यानंतर असे मानले जात आहे की प्रभासचा हा चित्रपट सायन्स फिक्शन आणि पौराणिक कथांचा मिलाफ असेल. ‘माय डियर डोंगा’चे दिग्दर्शक सर्वगन कुमार यांनी प्रभासच्या चित्रपटाबाबत एक मोठे विधान केले, ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

ते म्हणतात, मी कल्की 2898 एडी साठी अतिरिक्त लेखक म्हणून काम केले आहे. मी याबद्दल काहीही उघड करू शकत नाही, पण एक अनोखी संकल्पना या चित्रपटात पाहायला मिळेल एवढेच मी सांगू शकतो. आधी कोणीही असा प्रयत्न केला नाही, असे काहीतरी. सर्वगन कुमारचे वक्तव्य समोर आल्यानंतर आता चित्रपटाकडून चाहत्यांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. आत्तापर्यंत न पाहिलेल्या चित्रपटात काय होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

या चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर प्रसिद्ध अभिनेता कमल हसन कल्की 2898 एडीमध्ये खास कॅमिओ करणार आहे. दिशा पटनी देखील या चित्रपटाचा एक भाग असणार आहे. त्याचबरोबर या मोठ्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही मोठी भूमिका असणार आहे. हा चित्रपट 27 जून रोजी रिलीजसाठी सज्ज होत आहे.