
देशातील सर्वात मोठे न्यायालय, सर्वोच्च न्यायालय पुढील दोन आठवडे पूर्ण क्षमतेने काम करेल. त्यानंतर पुढील दीड महिना न्यायालय सुट्ट्यांवर जाणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुट्या 20 मेपासून सुरू होत असून 7 जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत. मात्र, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही न्यायालय पूर्णपणे बंद असणार नाही. यावेळी, सुट्टीतील खंडपीठ तयार केले जाते आणि ते सर्व महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करते.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयात कोणते न्यायाधीश घेणार सुनावणी? पहा संपूर्ण यादी
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार, सुट्टीतील खंडपीठ स्थापन करण्याचा अधिकार देशाच्या सरन्यायाधीशांकडे असतो. सध्या देशाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी आगामी उन्हाळ्याच्या सुट्यांसाठी एकूण 20 खंडपीठांची स्थापना केली आहे. न्यायालयाची ही खंडपीठे सुट्यांमध्ये सुमारे सात आठवडे वेगवेगळ्या प्रकरणांची सुनावणी करतील. सुप्रीम कोर्टातील सुट्टीच्या काळात कोणते न्यायाधीश सुट्टीतील खंडपीठाचा भाग असतील हे जाणून घेऊया.
पहिला आठवडा – 20 मे ते 26 मे
1. न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांचे खंडपीठ 2. न्यायमूर्ती पीएस नरसिंहा आणि न्यायमूर्ती संजय करोल यांचे खंडपीठ 3. न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांचे खंडपीठ
दुसरा आठवडा – 27 मे ते 2 जून
1. न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमूर्ती केव्ही विश्वनाथन यांचे खंडपीठ 2. न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांचे खंडपीठ 3. न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांचे खंडपीठ
तिसरा आठवडा – 3 जून ते 9 जून
1. न्यायमूर्ती पी.व्ही.संजय कुमार आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांचे खंडपीठ 2. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे खंडपीठ 3. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती के.व्ही.विश्वनाथन यांचे खंडपीठ.
चौथा आठवडा – 10 जून ते 16 जून
1. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे खंडपीठ 2. न्यायमूर्ती पीव्ही संजय कुमार आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांचे खंडपीठ 3. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांचे खंडपीठ
पाचवा आठवडा – 17 जून ते 23 जून
1. न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांचे खंडपीठ 2. न्यायमूर्ती राजेश बिंदल आणि न्यायमूर्ती प्रसन्ना बी वराळे यांचे खंडपीठ
सहावा आठवडा – 24 जून ते 30 जून
1. न्यायमूर्ती अभय एस. ओका आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल यांचे खंडपीठ 2. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरथना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे खंडपीठ 3. न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भट्टी यांचे खंडपीठ.
सातवा आठवडा – 1 जुलै ते 7 जुलै
1. न्यायमूर्ती सीटी रविकुमार आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचे खंडपीठ 2. न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांचे खंडपीठ 3. न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांचे खंडपीठ
(सुप्रीम कोर्टाची उन्हाळी सुटी गेल्या वर्षीच्या तुलनेत एक आठवडा जास्त असेल.)
