2 महिन्यांतच बंद झाला कपिल शर्माचा शो, कमी प्रेक्षकसंख्येमुळे घेतला मोठा निर्णय!


कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ ज्या उत्साहात सुरू झाला होता, तो आता थंडावल्याचे दिसत आहे. खरंतर, छोटा पडदा सोडून यावेळी कपिल शर्मा त्याच्या टीमसोबत ओटीटीमध्ये शिफ्ट झाला. कॉमेडियनने नेटफ्लिक्ससोबत करार केल्यानंतर ओटीटीवर त्याचा शो सुरू केला. पण आता अवघ्या 2 महिन्यांनंतर कपिलचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बंद होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

काल म्हणजेच 2 मे रोजी अर्चना पूरण सिंह हिने हा शो बंद झाल्याची माहिती शेअर केली होती. आत्तापर्यंत या शोचे 5 भाग प्रसारित झाले आहेत. या शोची सुरुवात रणबीर कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा साहनी यांच्यासोबत झाली होती. तर, आमिर खान गेल्या आठवड्यात शोमध्ये दिसला होता. आता हा शो बंद झाल्याच्या बातम्यांमुळे हा निर्णय का घेतला गेला, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

कपिलच्या शोची प्रेक्षकसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचे मानले जात आहे. शोच्या निर्मात्यांना आणि टीमला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण जर तुम्ही असा विचार करत असाल की ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ कमी प्रेक्षकसंख्येमुळे बंद होत आहे, तर ही बातमी चुकीची आहे. अर्चनाने तिच्या पोस्टमध्ये केकचा फोटोही शेअर केला आहे. तसेच, कॅप्शनमध्ये सीझन रॅप असे लिहिले होते. पण पिंकव्हिलाशी झालेल्या संवादादरम्यान अर्चनाने शोच्या समाप्तीबाबत सत्यता सांगितली.

अर्चना म्हणाली – होय, आम्ही द ग्रेट इंडियन कपिल शोचा पहिला सीझन पूर्ण केला आहे. बुधवारी आम्ही सीझनचा शेवटचा एपिसोड शूट केला. शोच्या सेटवर आम्ही खूप मजा केली आणि सेलिब्रेशन केले. या शोचा प्रवास खूपच आश्चर्यकारक आहे. हा शो बराच काळ चालणार आहे. अर्चनाच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की शोचा पहिला सीझन संपला आहे, आता कपिल आणि त्याचे कलाकार पुन्हा नव्या सीझनसह परतणार आहेत.