
जे आजपर्यंत झाले नाही, ते आता होणार आहे, आजपर्यंत तुम्ही लोकांनी सीएनजीचा पर्याय फक्त चारचाकी वाहनांमध्येच पाहिला असेल. पण आता जगातील पहिली CNG बाईक लाँच होणार आहे. बजाज ऑटोने आश्चर्यकारक कामगिरी करत सीएनजीवर चालणारी अशी बाईक तयार केली आहे. बजाज पल्सर NS400 च्या लॉन्च इव्हेंट दरम्यान, कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सीएनजी बाईक कधी लॉन्च केली जाईल याची माहिती दिली आहे.
CNG Bike : कन्फर्म! या दिवशी लाँच होणार जगातील पहिली CNG बाईक
सीएनजी मोटरसायकलची माहिती समोर आल्यापासून लोक सीएनजी बाइक लॉन्च होण्याची वाट पाहत आहेत. आता जनतेची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे दिसत आहे. या सीएनजी बाईकचे नाव काय असेल हे अद्याप समोर आलेले नाही.
बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी पुष्टी केली आहे की बजाजची पहिली CNG बाईक भारतात या वर्षी 18 जून रोजी लॉन्च केली जाईल. आता या बाईकच्या आगमनाने महागड्या पेट्रोलपासून दिलासा मिळणार असल्याचे दिसत आहे. याशिवाय पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी बाईकद्वारे चांगले मायलेज मिळण्याची आशा आहे.
बजाज सीएनजी बाईक अनेक वेळा चाचणी दरम्यान दिसली आहे. टेस्टिंग बाईकमध्ये दुहेरी-इंधन प्रणालीचा इशारा देखील आहे, ज्याप्रमाणे सीएनजी कारमध्ये पेट्रोलसोबत सीएनजी पर्याय उपलब्ध आहे, तोच बाइकमध्येही दिसून येईल.
चाचणी दरम्यान दिसलेल्या CNG बाईकमध्ये डिस्क आणि ड्रम ब्रेक सेटअप सोबत टेलीस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक होता. याशिवाय सुरक्षेसाठी या बाईकमध्ये सिंगल चॅनल एबीएस किंवा कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टिमचा समावेश केला जाऊ शकतो.
