Okaya Ferrato Disruptor : विसरा ओला-एथरला ! लाँच झाली 25 पैशांमध्ये 1 किमी धावणारी इलेक्ट्रिक बाइक


जर तुम्ही इलेक्ट्रिक बाइक किंवा स्कूटर घेण्याचा विचार करत असाल, तर बाजारात आलेल्या ओकायाच्या नवीन बाईककडे नक्की लक्ष द्या. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी Okaya EV ने आज भारतात आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक Okaya Ferrato Disruptor लाँच केली आहे. कंपनीने लक्झरी ब्रँड फेराटोच्या सहकार्याने ती विकसित केली आहे. ओकायाचा दावा आहे की इलेक्ट्रिक बाईक 25 पैशांमध्ये 1 किलोमीटर धावेल आणि पूर्ण चार्ज केल्यावर 129 किमीची रेंज मिळेल.

प्रीमियम डीलरशिपमधून ओकाया ही ई-बाईक विकेल. यासाठी कंपनी 100 हून अधिक शोरूम उघडण्याचा विचार करत आहे. कंपनीने आगामी बाईकचे प्री-बुकिंग सुरू केले आहे. पहिले 1,000 ग्राहक फेराटोच्या अधिकृत वेबसाइटवर 500 रुपये टोकन मनी देऊन नवीन इलेक्ट्रिक बाइक बुक करू शकतात. यानंतर बुकिंगसाठी 2,500 रुपये मोजावे लागतील.

Okaya Ferrato Disruptor च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले, तर याच्या दोन्ही चाकांवर ABS सह डिस्क ब्रेक असतील. बाईकची मस्क्युलर टँक बाइकला स्टायलिश बनवते. ई-बाईकमध्ये सस्पेंशनसाठी, पुढच्या बाजूला पारंपारिक टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस मोनो-शॉक युनिट देण्यात आले आहे. याशिवाय बाईकमध्ये टायर हगर, स्प्लिट-सीट सेटअप आणि दोन्ही टोकांना आकर्षक एलईडी दिवे यांसारखी वैशिष्ट्ये देखील असतील.

कामगिरीसाठी, ई-बाईकला पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर (PMSM) मिळेल, जी 6.37 kw ची पीक पॉवर आणि 228 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की Disruptor 95 kmph च्या टॉप स्पीडने धावू शकते. या बाइकमध्ये इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे तीन मोड उपलब्ध असतील. हँडलबारवर स्विच करून, तुम्ही तुमच्या गरजेनुसार मोड बदलू शकता.

इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देण्यासाठी, त्याला LFP तंत्रज्ञानासह 3.97 kWh बॅटरी पॅक मिळेल. हा एक निश्चित बॅटरी पॅक आहे, ज्यामुळे ही बाईक एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 129 किलोमीटरचे अंतर कापेल. ही इलेक्ट्रिक बाईक तुमच्यासाठी दररोज ड्रायव्हिंग किंवा शहरी प्रवासासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते.

Okaya Ferrato Disruptor ची भारतात एक्स-शोरूम किंमत 1,59,999 रुपये आहे. सुरुवातीला कंपनीची दिल्ली, गुरुग्राम, चेन्नई, अहमदाबाद, पुणे आणि बेंगळुरू सारख्या शहरांमधून विक्री सुरू करण्याची योजना आहे.