जर अणुयुद्ध झाले, तर होईल अकल्पनीय विनाश, 72 मिनिटांत मरतील 300 कोटी लोक


रशिया-युक्रेन युद्धात नाटो सैन्याने प्रवेश केला आहे. अमेरिका आणि फ्रेंच सागरी कमांडो थेट युक्रेन युद्धात उतरले आहेत आणि आता नाटो हवाई दलाचे वैमानिकही लष्करी कारवाई सुरू करू शकतात, असा रशियन गुप्तचरांचा अहवाल आहे. याचा सरळ अर्थ जागतिक युद्धाचा इशारा आहे. रशियासाठी हेरगिरी करणाऱ्या एका जर्मन लष्करी अधिकाऱ्याने म्हटले आहे की, रशियाची अण्वस्त्र हल्ल्याची तयारी पूर्ण झाली आहे. व्लादिमीर पुतिन कधीही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसह आण्विक हल्ल्याचे आदेश जारी करू शकतात. जर अणुयुद्ध झाले, तर 72 मिनिटांत पृथ्वीवर 5 हजार अणुस्फोट होतील आणि अकल्पनीय विनाश होईल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

72 मिनिटांत पृथ्वी कशी ध्वस्त शकते ते समजून घ्या. रशियन क्षेपणास्त्र डागताच ते 25 व्या मिनिटाला न्यूयॉर्कला पोहोचेल. Nuke Map च्या अंदाजानुसार, या पहिल्या हल्ल्यातच 16 लाख लोक मारले जातील आणि 30 लाख लोक जखमी होतील. यानंतर 25 ते 50 मिनिटांत पृथ्वीवर अणुयुद्ध सुरू होईल. रशियाचे युरोपवर हल्ले सुरू होतील. अमेरिका आणि फ्रान्स मिळून रशियावर अण्वस्त्र हल्ला करणार आहेत. अमेरिका आणि ब्रिटन मिळून चीनवर अण्वस्त्र हल्ला करतील आणि चीनही प्रत्युत्तर देईल. रशियाच्या आघाडीतील देश उत्तर कोरियाही अमेरिका आणि युरोपवर हल्ले करण्यास सुरुवात करेल. 50 व्या ते 72 व्या मिनिटापर्यंत मोठा विनाश होईल. याचा अर्थ या 22 मिनिटांत पृथ्वीवर 5,000 अणुस्फोट होतील, असा अंदाज आहे.

Nuclear War: A Scenario पुस्तकानुसार या स्फोटांमध्ये 300 कोटींहून अधिक लोकांचा मृत्यू होईल. 74,000 वर्षांपूर्वी सुमात्राच्या जंगलात ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता, त्यापेक्षा हे आणखी विनाशकारी असेल. 74,000 वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाला टोबा सुपर इप्शन असे म्हणतात. हा स्फोट 1,000 अणुबॉम्बच्या सामर्थ्याने झालेला स्फोट मानला जात होता. त्यावेळी 220 कोटी टन सल्फर डायऑक्साइड वातावरणात पसरले होते आणि पृथ्वी गोठण्यास सुरुवात झाली होती. आता, 5,000 अणुस्फोटांमुळे, 1,100 कोटी टन सल्फर डायऑक्साइड पृथ्वीच्या पर्यावरणाला व्यापेल. या दाट धुराच्या ढगामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही. यामुळे पृथ्वीवर अणु हिवाळा सुरू होईल.

‘न्युक्लियर वॉर: अ सीनरियो’ या पुस्तकात विनाशाचे चक्र 100 वर्षे चालू राहील असा अंदाज आहे. रशियन अणुहल्ल्याचा धोका युरोप अतिशय गांभीर्याने घेत आहे. रशियासाठी हेरगिरी करणाऱ्या एका जर्मन सैनिकाने याबाबत माहिती दिली आहे. जर्मन सुरक्षा एजन्सीने जर्मन सशस्त्र दल बुंडेस्वेहरच्या अधिकाऱ्याला अटक केली. त्या अधिकाऱ्यावर रशियासाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे.

अधिकाऱ्याने डसेलडॉर्फ न्यायालयात आपले म्हणणे नोंदवले. जर्मन गुप्तहेराच्या म्हणण्यानुसार रशिया अणुस्फोट घडवणार आहे. जर्मनीवर लवकरच अण्वस्त्र हल्ला होऊ शकतो, असे त्याला सांगण्यात आले. युक्रेन युद्ध युरोपातील अनेक देशांमध्ये पसरणार असल्याचे त्याला सांगण्यात आले. त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची हमी देऊन रशियाने त्याला आपला गुप्तहेर बनवले होते.

जर्मन गुप्तहेराच्या अहवालानुसार, आता सत्य बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे, कारण युक्रेनच्या बाहेरही रशियन हल्ले सुरू झाले आहेत. 30 एप्रिल रोजी, चेक प्रजासत्ताकमधील व्हर्बॅटिम शस्त्रास्त्र डेपोमध्ये स्फोट झाले. हे स्फोट रशियन एजंटांनी घडवून आणल्याचा दावा चेक एजन्सीने केला आहे. युरोपमध्ये युद्ध वाढण्याची भीती पसरत आहे, त्यामुळेच पोलंडनेही अमेरिकेच्या आण्विक सहकार्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अर्ज केला आहे. अमेरिकेची अण्वस्त्रे लवकरच पोलंडमध्ये तैनात केली जाऊ शकतात. याशिवाय युरोपियन युनियनने न्यूक्लियर कोऑपरेशन टीम तयार केली आहे. या टीममध्ये युरोपीय देशांच्या गुप्तचर अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रशियाच्या आण्विक कारवायांवर ते लक्ष ठेवून आहेत. युक्रेन युद्धाचा परिणाम अण्वस्त्र स्फोटात होणार हे युरोपीय देशांच्या गुप्तचर यंत्रणांना खात्री आहे आणि तसे झाले तर अकल्पनीय विनाश निश्चित आहे.