कमल हसनच्या ‘ठग लाइफ’मध्ये बॉलीवूडच्या दोन मोठ्या स्टार्सची एन्ट्री, होणार आहे धमाल


कमल हासनचा आगामी चित्रपट ‘ठग लाइफ’ मणिरत्नम दिग्दर्शित करत आहेत. मणिरत्नम त्यांच्या पहिल्या ‘नायकन’ चित्रपटाच्या अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा कमल हासनसोबत हातमिळवणी करत आहेत. नुकताच या चित्रपटातील कमल हसनचा लूकही रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटात कमल हसनसोबत त्रिशा कृष्णनही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्याशिवाय, चित्रपटाच्या उर्वरित कलाकारांबद्दल एक नवीन अपडेट आले आहे. या चित्रपटात मिर्झापूरचे दोन मोठे कलाकार सहभागी झाले आहेत.

रिपोर्ट्सनुसार, पंकज त्रिपाठी आणि अली फजल हे दोन कलाकार कमल हसनच्या ‘ठग लाइफ’ चित्रपटात सहभागी होणार आहेत. या चित्रपटात दोघेही मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाले, तर या दोघांना कमल हसनसोबत काम करताना पाहणे खूप मनोरंजक असेल. चित्रपटातील त्यांच्या एन्ट्रीसोबतच पंकज त्रिपाठी आणि अली फजल या दोघांनीही चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. दोघेही सध्या दिल्लीत चित्रपटाचे शूटिंग करत आहेत.

कमल हसन आणि सिलांबरसन टीआर देखील त्याच्यासोबत शूटिंगसाठी सामील झाले आहेत. सुरुवातीला सिलांबरसन टीआर ‘ठग लाइफ’मध्ये कोणतीही भूमिका साकारणार नव्हता. एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी सलमान दुलकरची निवड करण्यात आली होती. पण शूटिंगला उशीर झाल्यामुळे चित्रपटात सिलांबरसन टीआरची जागा घेण्यात आली. चित्रपटाचे शूटिंग पुढील महिन्यापर्यंत दिल्लीत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘ठग लाइफ’ हा चित्रपट एक ॲक्शन ड्रामा आहे. या चित्रपटात त्रिशा कृष्णन, गौतम कार्तिक, जोजू जॉर्ज, ऐश्वर्या लक्ष्मी आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल, मद्रास टॉकीज आणि रेड जायंट मुव्हीज यांनी केली आहे, तर ए आर रहमानने यासाठी संगीत दिले आहे.