ऑनलाइन विकली जात आहे ‘लघवीचे डाग’ असलेली डिझायनर जीन्स, किंमत ऐकून उडून जातील तुमचे पोपट


फॅशनचे जग किती विचित्र आहे, हे आपल्या सर्वांना चांगलेच माहीत आहे. कधी आणि कोणती स्टाईल ट्रेंड होईल, हे सांगणे कठीण आहे. कधी ‘फाटलेले’ स्टॉकिंग्ज तर कधी गवताचे डाग असलेली जीन्स फॅशन ट्रेंड बनतात. अनेकवेळा असे डिझायनर कपडे समोर येतात, जे पाहून लोकांना आश्चर्य वाटू लागते की ते असे का बनवले जातात. सध्या अशाच एका डिझायनर जीन्सने लोकांना हैराण केले आहे, जे पाहून तुम्हाला असे वाटेल की, जीन्स घालणाऱ्याने त्यात लघवी केली आहे. याहून आश्चर्याची बाब म्हणजे अनेकांना या लघवीचे डाग असलेल्या जीन्सला पसंती मिळत आहे.

ब्रिटीश-इलियन मेन्सवेअर ब्रँड जॉर्डनलुकाने जीन्सची ही अनोखी जोडी सादर केली आहे. यामध्ये कमरेच्या पुढील भागात चेनजवळ गडद रंगाचा डाग आहे. हे पाहून तुम्हाला असे वाटेल की, परिधान करणाऱ्याने त्याची पँट ओली केली आहे. पण डिझायनर डाग ही एकमेव गोष्ट नाही ज्याने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची किंमत कळल्यावर तुम्हाला धक्काच बसेल.


तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्याची किंमत 811 डॉलर्स (म्हणजे 67,600 रुपयांपेक्षा जास्त) आहे. पण जर तुम्ही ती कमी किमतीत खरेदी करू इच्छित असाल, तर तुम्हाला ती फक्त 50 हजार रुपयांमध्ये ऑनलाइन सेलमध्ये मिळू शकते. मात्र, तो आता संपल्याचे बोलले जात आहे.

जीन्सचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा बघणारेही थक्क झाले. अनेक वापरकर्त्यांना ते मजेदार वाटले, तर बहुतेक वापरकर्त्यांनी डिझाइनची खिल्ली उडवली. एका युजरने कमेंट केली आहे की, अखेर ही का बनवली गेली? तर दुसरा वापरकर्ता म्हणतो, याला मानसिक दिवाळखोरी म्हणतात. आणखी एका यूजरने लिहिले आहे की, ही काय वेळ आली आहे. डिझायनर कपड्यांद्वारे ओल्या पँटला मस्त दिसण्याचा प्रयत्न केला जात आहे.