Kailasanathar Temple : 1300 वर्षे जुन्या या मंदिराच्या प्रवेशद्वारावर दिसते 8 तीर्थक्षेत्रांची झलक


भारतातील प्रत्येक राज्यात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. ज्यात त्या त्या राज्याची संस्कृती दिसून येते आणि प्रत्येक मंदिराचीही एक वेगळी खासियत असते. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील बहुतांश मंदिरे त्यांच्या खास वास्तुकलेमुळे देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतातील कांचीपुरम, तामिळनाडू येथील कैलाशनाथर मंदिर हे अशा वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे.

कांचीपुरम हे हिंदू धर्माच्या लोकांसाठी पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. या शहराला मंदिरांचे शहर असेही म्हणतात. कैलाशनाथर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. हे मंदिर भगवान शिव, भगवान विष्णू, देवी, सूर्य, गणेश आणि कार्तिकेय यांच्या पूजेसाठी बांधले गेले आहे. कांचीपुरमच्या या मंदिरांमध्ये कैलाशनाथ मंदिर आहे ज्याला कांचीपुरमचे रत्न म्हटले जाते. हे मंदिर सुमारे 1,300 वर्षे जुने असून येथे येणारे लोक या मंदिराच्या रचनेने मंत्रमुग्ध होतात.

कैलाशनाथ मंदिराची रचना वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिराचे हे वैशिष्ट्य इतर मंदिरांपेक्षा वेगळे बनवते. दगडांचे तुकडे एकत्र करून हे मंदिर बांधण्यात आल्याचे पुरातत्वशास्त्रज्ञांचे मत आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे मुख्य मंदिर परिसरात 58 छोटी मंदिरे बांधण्यात आली आहेत. एवढेच नाही तर मंदिराच्या प्रवेशद्वारावर भिंतीवर 8 तीर्थक्षेत्रे आहेत. ज्यामध्ये दोन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला आहेत तर 6 उजव्या बाजूला आहेत. या मंदिराच्या गर्भगृहावर द्रविड स्थापत्यशास्त्रात विमान बांधण्यात आले आहे. गर्भगृहात ग्रॅनाईटचे अप्रतिम आणि विशाल शिवलिंग स्थापित केले आहे. गर्भगृहाच्या सभोवतालच्या भिंतींवर भगवान शंकराची लिंगोद्भव, उर्ध्व तांडव मूर्ती, त्रिपुरांतक आणि हरिहर अशी रूपे कोरलेली आहेत.

कांचीपुरमचे काकैलाशनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित आहे, त्यामुळे दर सोमवारी येथे शिवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येतात, यासोबतच श्रावण आणि महाशिवरात्री महिन्यात हिंदूंची मोठी गर्दी पाहायला मिळते. याशिवाय इतर अनेक उत्सवांच्या वेळी येथे भाविकांची जत्रा भरते, परंतु अध्यात्मिक दृष्टी व्यतिरिक्त कला आणि पुरातत्त्व शास्त्राची आवड असणारे लोकही या मंदिरात येतात.