Vastu Tips : या चित्रांनी सजवा तुमच्या घराच्या भिंती, उघडतील नशीबाचे द्वार


आपले घर आकर्षक आणि सुंदर दिसावे, यासाठी आपण अनेक सजावटीच्या वस्तू घरी आणतो. जसे भांडी, फुले, मूर्ती आणि चित्रे, विशेषत: आपण आपल्या घरात भिंती सजवण्यासाठी जी चित्रे लावतो, वास्तुशास्त्रानुसार, त्यांचे आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होऊ शकतात. चला जाणून घेऊया त्या चमत्कारिक फोटोंबद्दल जे तुमचे नशीब बदलू शकतात.

पांढरा वाघ
वास्तुशास्त्रानुसार हिंसक आणि आक्रमक प्राण्यांचे चित्र घरात ठेवू नये, पण वास्तुशास्त्रात पांढरा वाघ शुभ मानला गेला आहे. घराच्या पश्चिमेकडील भिंतीवर पांढऱ्या वाघाचे चित्र लावल्यास तुमचे घर वाईट नजरेपासून सुरक्षित राहते. तसेच तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारच्या काळ्या जादूचा प्रभाव पडत नाही.

पर्वत आणि मोठ्या इमारती
घराच्या नैऋत्य कोपऱ्यात पर्वत, मोठ्या इमारती आणि झाडांची चित्रे लावावीत. पण या चित्रांमध्ये कोणताही धबधबा किंवा नदी असू नये हे ध्यानात ठेवावे. असे म्हणतात की अशा चित्रांमुळे तुमच्या जीवनात स्थिरता येते आणि तुमचा आत्मविश्वास आणि ताकद वाढते.

कुबेराचा फोटो
कुबेराचा फोटो उत्तर दिशेला लावावा. याशिवाय सूर्याचा फोटो पूर्व दिशेला लावणे चांगले मानले जाते. वास्तूनुसार, यामुळे घरात पैसा येण्याचा मार्ग मोकळा होतो.

सुंदर स्त्रीचे चित्र
वास्तूनुसार घराच्या आग्नेय कोपऱ्यात सुंदर स्त्रीचे चित्र लावता येते. वास्तुशास्त्रात हे चांगले मानले जाते.

राधा-कृष्ण
घराच्या मास्टर बेडरूममध्ये उत्तर-पश्चिम कोपऱ्यात राधा-कृष्णाचे चित्र लावावे, यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते.

गरुड पक्षी
घरामध्ये गरुड पक्ष्याचा फोटो लावणे वास्तूमध्ये खूप चांगले मानले जाते. अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही गरूड पक्षी अतिशय शुभ मानले जाते. घरामध्ये गरुड पक्ष्याचा फोटो लावल्याने तुमचे धन, बल आणि स्थिरता वाढते.

समुद्र आणि वाहते पाणी
घरात वाहत्या पाण्याचे चित्र लावणे सर्वात शुभ मानले जाते. असे मानले जाते की घरामध्ये असे चित्र लावल्याने प्रत्येक काम पूर्ण होण्यास सुरुवात होते आणि कुटुंबातील सदस्यांचे नशीब बलवान होते आणि त्यासोबतच धनात वाढ होण्याची चिन्हे देखील असतात.

माशांचे चित्र
वास्तुशास्त्रानुसार, घरात मत्स्यालय ठेवणे सर्वात शुभ मानले जाते, परंतु जर तुमच्या घरात मत्स्यालय नसेल, तर तुम्ही मत्स्यालयाचा फोटो किंवा माशांचे चित्र घरात लावू शकता. माशांचे फोटो लावल्याने तुमची संपत्ती वाढते.