तरुण वयात काम करायला सुरुवात केली, अनेक नकार मिळाले, आज आहे एवढ्या कोटींच्या खासगी जेटची मालकिन


आज शिल्पा शेट्टीचे नाव इंडस्ट्रीतील ‘सुपर से भी ऊपर’ अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. पण तिच्या चित्रपट प्रवासात एक वेळ अशी आली, जेव्हा तिला अनेक नकारांना सामोरे जावे लागले. तिने तिच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले आहेत. पदवीनंतर तिने एका फॅशन शोमध्ये भाग घेतला. यादरम्यान तिची एका फोटोग्राफरशी भेट झाली, ज्याने तिचे काही फोटो काढले आणि अशा प्रकारे शिल्पाने इंडस्ट्रीत प्रवेश केला. यानंतरच तिला चित्रपटांच्या ऑफर आल्याचे बोलले जाते.

शिल्पा शेट्टीने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तिने इंडस्ट्रीत प्रवेश केला, तेव्हा ती केवळ 17 वर्षांची होती. तिच्या म्हणण्यानुसार, या वयात तिला ना गोष्टी समजल्या होत्या, ना तिने जग पाहिले होते.

शिल्पाने मुलाखतीत सांगितले होते की, तिला हिंदी नीट कसे बोलावे, हे देखील येत नाही. याच कारणामुळे तिला कॅमेऱ्यासमोर येण्याची भीती वाटत होती. आपल्या संघर्षकथेचा संदर्भ देत ती म्हणाली की, तिच्यासोबत असे अनेकवेळा घडले की, तिला कोणत्याही कारणाशिवाय चित्रपटातून काढून टाकण्यात येत होते. शिल्पाने 2009 मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. आता त्यांना विआन आणि शमिशा ही दोन मुले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, शिल्पाची एकूण संपत्ती सुमारे 150 कोटी रुपये आहे.

याशिवाय त्यांचा समुद्राभिमुख बंगला आहे, ज्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये आहे. फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार, तिची बॅस्टियन नावाची रेस्टॉरंट चेनही आहे. याशिवाय ती ‘सिंपल सोलफुल: शिल्पा शेट्टी’ या फिटनेस ॲपवरूनही कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर, बेंटले आणि लॅम्बोर्गिनी एव्हेंटाडोर सारख्या लक्झरी वाहनांसह तिच्याकडे एक खाजगी जेट देखील आहे.

शिल्पा शेट्टीच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अलीकडेच ही अभिनेत्री रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. याशिवाय ती ‘सुखी’ चित्रपटातही दिसली होती.