
2023 हे वर्ष साऊथ सुपरस्टार रजनीकांतसाठी खूप चांगले वर्ष होते. गेल्या वर्षी त्यांचा ‘जेलर’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपट नेल्सन यांनी दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तामिळ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. आता चाहते ‘जेलर’च्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ‘जेलर’च्या सिक्वेलच्या बातम्या जोरात होत्या. रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी आता एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. त्याच्या चित्रपटाशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे.
रजनीकांतच्या ‘जेलर 2’ बद्दल समोर आली अशी धमाकेदार बातमी, मनाला आनंद होईल!
रिपोर्ट्सनुसार, ‘जेलर 2’ चा पहिला ड्राफ्ट तयार करण्यात आला असून, त्याला अंतिम रूप देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन यांना यावेळी रजनीकांतची व्यक्तिरेखा आणखी वाढवायची आहे. रजनीकांत आणि सन पिक्चर्सनेही याला सहमती दर्शवली आहे. या चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन या वर्षी जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजनीकांतचा ‘जेलर’ या वर्षाच्या अखेरीस फ्लोरवर घेण्याची तयारी सुरू आहे. सध्या रजनीकांत ‘थलैवर 171’मध्ये व्यस्त आहेत. लोकेश कनगराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ‘जेलर 2’चे तात्पुरते नाव ‘हुकूम’ ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. ‘जेलर’ नंतर हा शब्द रजनीकांतसाठी खूप लोकप्रिय झाला. मात्र, त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. रिपोर्ट्सनुसार, निर्माते ‘जेलर 2’ आणि ‘हुकुम’ च्या टायटलबद्दल संभ्रमात आहेत. परंतु याला ‘हुकुम’ असे नाव द्यावे, असे बहुतेकांचे मत आहे.
या बातम्यांदरम्यान, रजनीकांतने नुकतेच लोकेश कनागराजच्या ‘थलैवर 171’ चे प्रोमो शूट केले आहेत, ज्याची घोषणा येत्या 10 दिवसांत केली जाऊ शकते. या चित्रपटाचे चित्रीकरण यावर्षी मे-जूनमध्ये सुरु होऊ शकते.
