‘मैदान’ सारख्या 5 स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर घातला होता धुमाकूळ


शाहरुख खानच्या ‘चक दे ​​इंडिया’पासून ते आमिर खानच्या ‘दंगल’पर्यंत बॉलीवूडमधील स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटांना नेहमीच वेगळा चाहता वर्ग असतो. या चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. काल म्हणजेच 11 एप्रिल रोजी अजय देवगणचा ‘मैदान’ बॉक्स ऑफिसवर धडकला आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘मैदान’ च्याआधीही खेळावर आधारित अनेक चित्रपट बनले आहेत. त्याच्या कमाईवर एक नजर टाकूया.

अजय देवगणच्या ‘मैदान’बाबत असा अंदाज वर्तवला जात आहे की, हा चित्रपट मोठा व्यवसाय करणार आहे. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करणार की नाही हे येणारा काळच सांगेल. पण बॉलीवूडमध्ये स्पोर्ट्स चित्रपटांना मोठा इतिहास आहे. चला या चित्रपटांची ओळख करून घेऊया.

1. दंगल
आमिर खानच्या ‘दंगल’ने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. या चित्रपटाची देशाबाहेरही मोठी चलती होती. चित्रपटाची कथा कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्यांच्या दोन मुलींवर आधारित होती. रिपोर्ट्सनुसार, ‘दंगल’चे बजेट जवळपास 70 कोटी रुपये होते. त्याच वेळी, या चित्रपटाने जगभरात सुमारे 2024 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

2. सुलतान
सुपरस्टार सलमान खानचा ‘सुलतान’ 2016 मध्ये थिएटरमध्ये आला होता. हा चित्रपटही कुस्तीवर आधारित होता. या चित्रपटामध्ये सलमान खानने हरियाणवी कुस्तीपटूची भूमिका साकारली होती. 80 कोटी रुपयांमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन सुमारे 607.84 कोटी रुपये होते.

3. M.S धोनी- द अनटोल्ड स्टोरी
‘एमएस धोनी’ हा क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचा बायोपिक होता. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात सुशांत सिंगने धोनीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. 104 कोटी रुपयांमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात सुमारे 215.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता.

4. भाग मिल्खा भाग
‘भाग मिल्खा भाग’ हा सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात फरहान अख्तरने मिल्खा सिंगची भूमिका साकारली होती. 2013 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. 30 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 168 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

5. ब्रदर्स
अक्षय-सिद्धार्थ स्टारर ‘ब्रदर्स’ 2015 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट हॉलिवूडच्या ‘वॉरियर’चा रिमेक होता. या चित्रपटाची कथा दोन भावांभोवती फिरते, जे बालपणातच एकमेकांचे शत्रू बनतात. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने 82 कोटींची कमाई केली होती.