थिएटरमध्ये रिलीज होण्यापूर्वी OTT वर का येत आहे प्रभासच्या ‘कल्की’ची ॲनिमेटेड आवृत्ती ?


प्रभास या वर्षी खूप मोठा चित्रपट घेऊन येत आहे. नाव आहे ‘ कल्की 2898 एडी’, जो हिंदू पौराणिक कथांवर आधारित आहे. या चित्रपटात प्रभाससोबतच दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन यासारखे मोठे स्टार्सही दिसणार आहेत. हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेचा भाग आहे. येत्या दोन महिन्यांत पूर्ण होत असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. खरंतर हा चित्रपट 9 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. पण, त्याआधी चाहत्यांना या चित्रपटाची ॲनिमेटेड आवृत्तीही पाहायला मिळणार आहे.

रिपोर्टनुसार, दिग्दर्शक नाग अश्विन यांनी ‘कल्की’शी संबंधित ॲनिमेटेड व्हर्जन बनवले आहे, जो चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. असे सांगितले जात आहे की चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यापूर्वी निर्माते चित्रपटाची ॲनिमेटेड आवृत्ती OTT वर प्रदर्शित करतील. त्या ॲनिमेटेड व्हर्जनच्या माध्यमातून निर्माते प्रेक्षकांना ‘कल्की’च्या दुनियेची ओळख करून देणार असल्याचे बोलले जात आहे. याचा अर्थ असा की ‘कल्की’ आणि त्यातील पात्रांशी संबंधित काही माहिती ॲनिमेटेड आवृत्तीमध्ये पाहिली जाण्याची शक्यता आहे, जेणेकरून चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा लोकांना त्याची कथा समजणे सोपे होईल. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

काही काळापूर्वी प्राईम व्हिडिओने चित्रपटाचे ओटीटी अधिकार (हिंदी आवृत्ती वगळता) विकत घेतल्याची बातमी आली होती. हे हक्क अंदाजे 150 कोटी रुपयांना विकले गेल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर काही वेळाने एका रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले की हिंदी व्हर्जनचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सकडे 175 कोटी रुपयांना गेले आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. आता जर ओटीटीचे अधिकार खरोखरच विकले गेले असतील आणि निर्माते ॲनिमेटेड आवृत्ती आणणार असतील, तर ते फक्त या दोन प्लॅटफॉर्मवरच दिसतील.

मात्र, आंध्र प्रदेशमध्ये मे महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे निर्माते चित्रपटाची रिलीज डेट 9 मे रोजी रिलीज करण्याऐवजी पुढे ढकलण्याची चर्चा आहे. याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच होऊ शकते, असे बोलले जात आहे.