नागिननंतर आता निया शर्मा बनणार ‘जकीन’, सीरियलचे नाव ऐकून आवरत येणार नाही हसू


2020 मध्ये निया शर्मा ‘नागिन’ या मालिकेत दिसली होती. निया एकता कपूरच्या सीरियलच्या 4 सीझनमध्ये इच्छाधारी नागिनची मुख्य भूमिका साकारताना दिसली होती. आता 4 वर्षांनंतर टेलिव्हिजनची ही कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. निया शर्मा कलर्स टीव्हीच्या फँटसी फिक्शन शो ‘सुहागन चुडैल’मधून टीव्हीवर पुनरागमन करणार आहे. याची पुष्टी खुद्द निया शर्माने केली आहे आणि ही बोल्ड टेलिव्हिजन अभिनेत्री तिच्या नवीन शोबद्दल खूप उत्सुक आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मालिकेच्या सुरुवातीच्या ट्रॅकमध्ये निया शर्मा खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘सुहागन चुडैल’ ही एका सुंदर जकीनीची कथा आहे, जी एका विवाहित महिलेचा नवरा हिसकावून घेते. या मालिकेसाठी आतापर्यंत फक्त निया शर्मालाच कास्ट करण्यात आले आहे. उर्वरित दोन कलाकार येत्या आठवड्यात फायनल केले जातील. कास्टिंगची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या 15 दिवसांत या मालिकेचे शूटिंग सुरू होऊ शकते. निया शर्मा, जिला ‘निया मॅनियाक’ म्हणूनही ओळखले जाते, तिचे चाहते तिच्या टीव्ही कमबॅकबद्दल खूप उत्सुक आहेत.


निया शर्मा ही एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, जिला बिग बॉसच्या प्रत्येक सीझनची ऑफर दिली जाते. मात्र दरवर्षी निया या शोमध्ये सहभागी होण्यास नकार देते. मात्र, बिग बॉसला नकार देणाऱ्या निया शर्माने आतापर्यंत ‘खतरों के खिलाडी’ आणि ‘झलक दिखला जा’ सारख्या रिॲलिटी शोमध्ये नशीब आजमावले आहे. पण या दोन्ही शोमध्ये निया काही खास दाखवू शकली नाही. आता ही बोल्ड आणि ब्युटीफुल टीव्ही अभिनेत्री ‘सुहागन चुडैल’मध्ये कोणते आश्चर्यकारक काम करणार आहे, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.