गॅस सिलेंडरच्या दरात घट, वर्षभरात 250 रुपयांहून झाली अधिक घसरण


देशातील चारही महानगरांमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. यावेळी ही कपात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात झाली आहे. आयओसीएलच्या वेबसाइटनुसार, व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांपेक्षा जास्त कपात करण्यात आली आहे. तर मार्च महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षभरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 250 रुपयांहून अधिक घट झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले, तर त्यात कोणताही बदल झालेला नाही. शेवटचा बदल 9 मार्च रोजी करण्यात आला. जेव्हा देशातील सरकारने गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. त्याआधी 30 ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील हे देखील आम्ही तुम्हाला सांगतो.

किती आहे घरगुती गॅस सिलेंडरची किंमत ?

  • देशाची राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 803 रुपयांना मिळणार आहे. गेल्या वर्षभरात 300 रुपयांची कपात झाली आहे.
  • कोलकातामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 829 रुपयांपर्यंत झाली आहे. वर्षभरापूर्वी ही किंमत 1129 रुपये होती.
  • मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 802.50 रुपयांवर पोहोचली आहे. येथेही गॅस सिलेंडर वर्षभरात 300 रुपयांनी स्वस्त झाला होता.
  • चेन्नईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 818.50 रुपयांवर पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी येथे किंमत 1118.50 रुपये होती.

व्यावसायिक गॅस सिलेंडर झाला स्वस्त

  • देशाची राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 30.5 रुपयांनी कमी झाली असून त्याची किंमत 1764.50 रुपये झाली आहे. गेल्या वर्षभरात 263.5 रुपयांची घट झाली आहे.
  • कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 32 रुपयांनी कमी झाली असून त्याची किंमत 1879 रुपये झाली आहे. गेल्या वर्षभरात 221 रुपयांची कपात झाली आहे.
  • मुंबईत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 31.5 रुपयांनी कमी झाली असून त्याची किंमत 1717.50 रुपये झाली आहे. गेल्या वर्षभरात 262.5 रुपयांची घट झाली आहे.
  • चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 30.5 रुपयांनी कमी झाली असून त्याची किंमत 1930 रुपये झाली आहे. गेल्या वर्षभरात 262.5 रुपयांची घट झाली आहे.