एके ४७ आता वेपन ऑफ पीस ?


जगभरातील दहशतवादी आणि अनेक देशांची लष्करे यांच्या पूर्ण पसंतीस उतरलेल्या रशियन क्लाशनिकोव्ह अॅसल्ट रायफल्स म्हणजेच एके ४७ रायफलचा मेक ओव्हर केला गेला असून रशियन उत्पादकांनी या रायफलसाठी नवीन लोगो आणि नवीन स्लोगन्स तयार केली आहेत. या रिब्रँडींग ड्राइव्हचे मास्कोत नुकतेच लॉचिंग करण्यात आले आहे. या रिब्रँडींगच्या कँपेनिंगसाठी कंपनीने ३ लाख ८० हजार डॉलर्स केले असल्याचेही सांगितले जात आहे.

नवीन रायफल्सवर सीके अशी अक्षरे कोरली गेली आहेत. ही अक्षरे काळ्या लाल रंगात एकाच मोल्डमध्ये आहेत. त्याखाली क्लाशनिकोव्ह कन्सर्न असे नांव रशियन भाषेत लिहिले गेले आहे. या साठी दोन नवीन स्लोगनही तयार करण्यात आली असून इंग्रजीतील स्लोगन प्रोटेक्टिव्ह पीस असे आहे तर रशियन भाषेत त्याचे दोन अर्थ आहेत. एक आहे वेपन ऑफ पीस तर दुसरे आहे वेपन ऑफ वर्ल्ड.

ही रायफल तयार करणारे मिखाईल क्लाशनिकोव्ह यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला होता. रशियाने युक्रेनबाबत जी भूमिका स्वीकारली त्यामुळे या कंपनीवर परदेशांतून अलिखित बंदी घातली गेली होती. मात्र या कंपनीचा मुख्य भर निर्यातीवरच असल्याने त्याचा मोठाच फटका कंपनीला बसला आहे. नवीन रायफल्स जुन्या रायफल्सच्या तुलनेने अधिक स्वस्त आणि उत्पादन करण्यासही अधिक सुलभ असल्याचे सांगितले जात आहे. त्यांची देखभालही फारशी करावी लागत नाही. रायफल्सबरोबरच कंपनी फॅशन जगतातही प्रवेश करत असून अंगावर परिधान करता येतील अशा अॅक्सेसरीज बाजारात आणणार आहे.

जगभरात आत्तापर्यंत १ कोटींहून अधिक एके ४७ रायफली विकल्या गेल्या आहेत. आजपर्यंतचे हे सर्वात लोकप्रिय हत्यार मानले जाते. यावर्षात कंपनीने आत्तापर्यंत १ लाख ४० हजार हत्यारे विकली आहेत. मात्र त्यांचा मुख्य भर आशिया आणि आफ्रिकेवर होता. आता कंपनीने द. अमेरिका, आशिया पॅसिफिक आणि आफ्रिकेच्या बाजारातही उतरण्याचा निर्णय घेतला आहे.