तो खान ज्याने पहिल्यांदा नाकारला आमिर खानचा चित्रपट, त्याचा चित्रपट आल्यावर उडाली खळबळ


सैफ अली खानला हिंदी चित्रपटसृष्टीत येऊन तीन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. 1993 मध्ये आलेल्या ‘परंपरा’ चित्रपटातून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. मात्र, इंडस्ट्रीत पाय रोवणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. त्याच्या सुरुवातीच्या काळात त्याला आमिर खान, शाहरुख खान, अक्षय कुमार, गोविंदा, सुनील शेट्टी, सलमान खान यासारख्या स्टारडमचा सामना करावा लागला. त्यानंतर 2001 मध्ये सैफ अली खान फरहान अख्तर दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ या चित्रपटात दिसला. या चित्रपटानंतर सैफचे करिअर नवीन उंचीवर पोहोचले.

‘दिल चाहता है’मध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत नव्हता. आमिर खान, प्रीती झिंटा, डिंपल कपाडिया आणि अक्षय खन्ना यासारखे कलाकार या चित्रपटात आधीच उपस्थित होते. चित्रपटातील लांबलचक स्टारकास्ट आणि छोटी भूमिका यामुळे सैफला सुरुवातीला हा चित्रपट करायचा नव्हता. सुरुवातीला जेव्हा त्याला चित्रपटाची ऑफर आली, तेव्हा त्याने तो करण्यास नकार दिला.

एका मुलाखतीत सैफ अली खानने ‘दिल चाहता है’ला नकार दिल्यावर सांगितले होते की, सेकंड हाफमध्ये माझी भूमिका खूपच कमी होती, म्हणून मी नकार दिला होता. डिंपलने मला माझ्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले. जावेद अख्तर साब यांनी मला आश्वासन दिले होते की ते सर्व गोष्टींकडे लक्ष देतील.

मात्र, जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्या भूमिकेला खूप पसंती मिळू लागली, तेव्हा त्याला आपला निर्णय चुकीचा वाटू लागला. तो म्हणाला, मला समजले की भूमिकेची लांबी महत्त्वाची नाही. रेस्टॉरंट आणि कारमधील दोन दृश्यांमुळे मी चित्रपटाला हो म्हणालो. समीर विसरणार नाही, हे मला माहीत होतं. मी खूप मेहनत केली. मला मिळालेला प्रतिसाद माझ्या कल्पनेच्या पलीकडचा होता.

मुलाखतीदरम्यान सैफ अली खान म्हणाला होता की, जेव्हा त्याचे सर्व बाजूंनी कौतुक होत होते, तेव्हा त्याला असे वाटत होते की, आपण ऑस्कर जिंकला आहे. वर्षानुवर्षे अंतर राखणारे लोकही सैफला हाक मारू लागले. तो म्हणाला की लोक आपली स्तुती करतात, तेव्हा छान वाटते.