जाणून घ्या शार्क टँक इंडियाच्या 8 जजकडे किती आहे संपत्ती


सोनी टीव्हीचा प्रसिद्ध रिॲलिटी शो आणि बिझनेस इन्व्हेस्टर्स शार्क टँक इंडिया हा भारतातील अतिशय लोकप्रिय शो आहे. शोमध्ये, नवीन उद्योजक त्यांच्या व्यवसायाच्या कल्पना आणतात आणि शोच्या जजसमोर त्यांचे व्यवसाय मॉडेल सादर करून त्याच्यासाठी निधी उभारण्याचा प्रयत्न करतात. या शोचे जज करोडोचे मालक आहेत आणि त्यांनी देशात अनेक मोठ्या युनिकॉर्न कंपन्या तयार केल्या आहेत. कुणाकडे 6000 कोटी रुपयांची, तर कुणाकडे 180 कोटी रुपयांची संपत्ती आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला या 8 जजच्या शैलीबद्दल सविस्तरपणे सांगणार आहोत.

1. अमित जैन
यावेळी, शार्क टँकच्या निर्मात्यांनी अशनीर ग्रोव्हरच्या जागी कार देखो ग्रुपचे संस्थापक अमित जैन यांची निवड केली आहे. अमित जैन यांनी आयआयटी दिल्लीमधून शिक्षण घेतले आहे, त्यानंतर त्यांनी 2007 मध्ये आपल्या भावासोबत CarDekho.Com, देशात ऑनलाइन कार विक्रीचे व्यासपीठ सुरू केले. याशिवाय अमित जैन हे InsuranceDekho.com चे मालक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमित जैन यांची एकूण संपत्ती 3,017 कोटी रुपये आहे.

2. अमन गुप्ता
अमन गुप्ता हे शार्क टँक इंडियाचे सर्वात लोकप्रिय जज आहेत. शोच्या पहिल्या सीझनमध्येही त्यांची खास स्टाइल लोकांना खूप आवडली होती. अमन गुप्ता यांनी लोकप्रिय ऑडिओ ब्रँड boAt सुरू केली. ते कंपनीचे सह-संस्थापक आणि सीएमओ आहेत. याशिवाय, कंपनी स्मार्टवॉच आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू श्रेणींमध्ये अनेक वस्तू विकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमन गुप्ताची एकूण संपत्ती 720 कोटी रुपये आहे.

3. विनीता सिंग
विनीता सिंग शार्क टँक इंडियाच्या सर्वात स्टायलिश जजपैकी एक आहे. आयआयटी मद्रासमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग केल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्या देशातील सर्वात मोठ्या कॉस्मेटिक कंपनी शुगरच्या सह-संस्थापक देखील आहेत. विनिता सिंग यांची एकूण संपत्ती 300 कोटी रुपये आहे.

4. अनुपम मित्तल
देशातील सर्वात मोठी वैवाहिक वेबसाइट Shaadi.com चे मालक अनुपम मित्तल यांचीही संपत्ती करोडोंमध्ये आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की त्यांनी आतापर्यंत 220 हून अधिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. रिपोर्ट्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 185 कोटी रुपये आहे.

5. नमिता थापर
नमिता थापर या देशातील सर्वात मोठी फार्मा कंपनी Emcure च्या CEO आहेत. त्यांनी GlaxoSmithKline या अमेरिकन कंपनीत काम केले आहे. त्यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे.

6. पियुष बन्सल
पीयूष बन्सल हे शार्क टँक इंडियाचे सर्वात लोकप्रिय जज आहेत. ते 36 वर्षांचे आहेत आणि देशातील सर्वात मोठ्या आयवेअर कंपनी लेन्सकार्टचे सीईओ आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीयूष बन्सल यांची एकूण संपत्ती 600 कोटी रुपये आहे.

7. दीपंदर गोयल
Zomato सह-संस्थापक आणि CEO दीपंदर गोयल यांची एकूण संपत्ती 2,023 कोटी रुपये आहे.

8. रितेश अग्रवाल
OYO Rooms चे संस्थापक आणि CEO रितेश अग्रवाल यांची एकूण संपत्ती 16,000 कोटी रुपये आहे.