व्हील अलाइनमेंट झाले खराब? तर कार देईल हे सिग्नल, त्याच्याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात


प्रत्येकजण कारची सर्व्हिस करुन घेतात, परंतु कारसाठी हे पुरेसे नाही. सर्व्हिस सेंटरमध्ये अनेक वेळा कार मालकाला व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगसाठी विचारले जाते, पण पैसे वाचवण्यासाठी अनेक लोक व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगकडे दुर्लक्ष करतात. कार सर्व्हिसिंगच्या बाबतीत, लोकांना माहित आहे की दर 10 हजार किलोमीटरवर कारची सर्व्हिसिंग करुन घेणे आवश्यक आहे, परंतु लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नाही की किती किलोमीटरनंतर अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग तपासले पाहिजे?

लोक गाडी चालवत राहतात, पण चाकांचे अलाइनमेंट खराब झाले आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आता प्रश्न असा पडतो की वाहनाचे व्हील अलाइनमेंट खराब झाले आहे, हे कसे समजायचे? खराब व्हील अलाइनमेंट बॅलन्सिंगमुळे, केवळ वाहनाच्या टायरवरच नाही, तर वाहनाच्या सस्पेन्शन आणि इंजिनवरही विपरीत परिणाम होऊ लागतो.

आता हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो की, चाकांचे अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग किती किलोमीटरवर तपासावे लागते, हे त्यांना कसे कळणार? प्रत्येक 5 हजार ते 10 हजार किलोमीटरवर व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग केले पाहिजे. सर्व्हिसिंग करुन घेताना तुम्ही व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग देखील करू शकता.

कच्च्या रस्त्यावर किंवा खड्डे भरलेल्या रस्त्यावर वाहन चालले की, चाकांचे अलाइनमेंट खराब होऊ लागते. अशा रस्त्यावर वाहन दररोज धावत असेल, तर दर 3 हजार ते 5 हजार किलोमीटरवर व्हील अलाइनमेंट करून घ्या.

जेव्हा कारचे व्हील अलाइनमेंट खराब होऊ लागते, तेव्हा कारच्या स्टिअरिंगमध्ये कंपन जाणवते. याशिवाय, जेव्हा तुम्ही गाडीचे स्टेअरिंग सोडून काही सेकंद चालवता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की कार सरळ जाण्याऐवजी एका दिशेने धावत आहे, जेव्हा असे होते, तेव्हा टायर घासायला लागतात. कार 60 च्या पुढे गेल्यास स्टिअरिंगमध्ये कंपन जाणवते.

व्हील अलाइनमेंट न केल्याने वाहनाचे नुकसान होते आणि सर्वात जास्त नुकसान वाहनाच्या टायरचे होते. जर एखाद्याने बराच वेळ ऍडजस्टमेंट किंवा बॅलन्सिंग केले नाही, तर वाहनाचे शॉकर्स खराब होऊ लागतात आणि वाहन एका दिशेने धावत असल्याने इंजिनवरही लोड येऊ लागतो.

व्हील अलाइनमेंट आणि व्हील बॅलन्सिंग सारखे वाटू शकते, परंतु ते एकसारखे नाहीत. तुमच्या कारच्या सस्पेन्शनशी व्हील अलाइनमेंटचा थेट संबंध आहे, ही प्रणाली तुमच्या वाहनाची चाके जोडण्याचे काम करते. व्हील अलाइनमेंटचे काम म्हणजे टायर ॲडजस्ट करणे जेणेकरुन गाडी रस्त्यावर व्यवस्थित धावेल.

व्हील बॅलन्सिंग हे व्हील अलाइनमेंटचे समानार्थी शब्द आहे, परंतु दोन्ही एकसारखे नाहीत. सुरळीत ड्रायव्हिंग, स्थिरता आणि तुमच्या कारच्या टायरच्या सुरक्षिततेसाठी व्हील बॅलन्सिंग आवश्यक असते.

व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंगची किंमत दोन गोष्टींवर अवलंबून असते, पहिली म्हणजे वाहनाच्या मॉडेलवर आणि दुसरे म्हणजे तुम्ही कुठून अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग करत आहात. कंपनीच्या सेवा केंद्रावरील खर्च थोडा जास्त असू शकतो.