कशी मिळते ED मध्ये नोकरी, काय असावी पात्रता, किती मिळतो पगार? जाणून घ्या संपूर्ण तपशील


ईडीने काल, 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याच्या आरोपाखाली अटक केली. ईडी म्हणजे इनफोर्समेंट डायरेक्टरेट, त्याला अंमलबजावणी संचालनालय असेही म्हणतात. कोणत्याही घोटाळ्यात छापेमारी, अटक वगैरे झाल्यास अंमलबजावणी संचालनालयाचेच नाव पुढे येते. पण ED मध्ये नोकरी मिळवायची असेल, तर पात्रता काय असावी आणि निवडलेल्या उमेदवाराला दरमहा किती पगार मिळतो ते जाणून घेऊया.

आम्ही तुम्हाला सांगतो की, ईडी बहुतेक पदांवर प्रतिनियुक्तीच्या आधारावर भरती करते. त्यासाठी ईडी वेळोवेळी रिक्त पदेही जाहिर करते. त्याच वेळी, कर्मचारी निवड आयोग ED मध्ये एकूण पदांची भरती करते.

एसएससी कशी करते ईडीमध्ये भरती ?
कर्मचारी निवड आयोग दरवर्षी एसएससी सीजीएल परीक्षा घेते. त्यासाठी केंद्रीय विभागांमध्ये भरती केली जाते. एसएससी सीजीएल परीक्षेद्वारे सहाय्यक ईडी अधिकाऱ्याच्या पदांची भरती करते.

कोण करू शकतो अर्ज ?
असिस्टंट ईडी ऑफिसर पदांवर नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना SSC CGL साठी अर्ज करावा लागेल. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करावा लागेल. एसएसएसी यासाठी अधिसूचना जारी करते. असिस्टंट ईडी ऑफिसर पदांसाठी जास्तीत जास्त शैक्षणिक पात्रता पदवी पास असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे दरम्यान असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेतही सूट देण्यात आली आहे.

कशी केली जाते निवड ?
सहाय्यक ईडी अधिकारी पदांसाठी निवड टियर 1 आणि टियर 2 परीक्षेद्वारे केली जाते. टियर 1 परीक्षेत यशस्वी झालेले उमेदवार टियर 2 परीक्षेत बसतात आणि टियर 2 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी होते आणि त्यानंतर त्यांची नियुक्ती केली जाते. निवडलेल्या उमेदवाराला दरमहा सुमारे 44900 ते 142400 रुपये पगार दिला जातो.