होलिका दहनाच्या वेळी केलेले हे उपाय आहेत खूप चमत्कारिक, ते दूर करू शकतात गरीबी देखील


वैदिक दिनदर्शिकेनुसार होळी हा रंगांचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. होळीच्या आदल्या रात्री होलिका दहन केले जाते. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार आहे. होलिका वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या दिवशी विधीनुसार पूजेनंतर पदार्थ तयार केले जातात आणि शुभ मुहूर्तावर होलिका पेटवली जाते.

ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन करताना शास्त्रांनी सांगितलेल्या काही उपायांचा अवलंब केल्यास त्याला सुख-समृद्धी मिळते आणि अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. अशा स्थितीत होलिका दहनादरम्यान केलेले जाणारे खास उपाय जाणून घेऊया.

होलिका दहनाच्या दिवशी काळे कापड घेऊन त्यात काळे तीळ, 7 लवंगा, 3 सुपारी, 50 ग्रॅम मोहरी आणि माती टाकून पोटली बनवा. यानंतर, ही पोटली स्वतःवरुन 7 वेळा काढा आणि होलिका दहनाच्या अग्निमध्ये टाका. असे केल्याने तुमची जुनी आर्थिक समस्या दूर होऊ शकते, असे मानले जाते.

जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात सतत नुकसान होत असेल, तर होलिका दहनाच्या रात्री 24 गोमती चक्र घेऊन शिवलिंगाला अर्पण करा. असे म्हटले जाते की यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात लवकरच नफा मिळू लागेल आणि काही वेळातच तोटा नफ्यात बदलेल.

होलिका दहनाच्या आदल्या दिवशी आपल्या हातांनी शेणाची गोवरी बनवा. त्यानंतर ज्या व्यक्तीला नजर लागली आहे, त्याच्यावरुन ती गोवरी 7 वेळा उतरवा. यानंतर ती गोवरी होलिका दहनाच्या अग्नीत टाका. असे केल्याने ज्याला नजर लागली आहे, ती लवकरच दूर होईल.

होलिका दहनाच्या दिवशी घरातील सर्व सदस्यांनी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा, एक बताशा आणि एक सुपारी होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावी. याशिवाय होलिका दहनाला 11 वेळा प्रदक्षिणा केल्यावर सुके नारळही नैवेद्य म्हणून अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि टिकून राहते.

जर एखाद्या व्यक्तीला लग्नाची खूप दिवसांपासून काळजी वाटत असेल किंवा त्याच्या लग्नाला उशीर होत असेल, तर होळीच्या दिवशी शिवमंदिरातील शिवलिंगाला 1 पान, 1 सुपारी आणि एक हळद एकत्र अर्पण करा. यानंतर मंदिरातून बाहेर पडताना मागे वळून पाहू नका. असे केल्याने लवकर विवाह होण्याची शक्यता असते.

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या काळ्या जादूने त्रास होत असेल, तर होलिका दहनाच्या रात्री, जिथे होलिका दहन केली जात आहे, तिथे एक खड्डा खणून त्यात 11 अभिमंत्रित केलेल्या गोवऱ्या पुरून टाका. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या गोवऱ्या बाहेर काढा, निळ्या कपड्यात बांधून वाहत्या पाण्यात सोडा. असे केल्याने कोणत्याही प्रकारच्या काळी जादूपासून मुक्ताता मिळवता येईल.