येथून डाऊनलोड करु शकता मतदार ओळखपत्र, अद्याप बनवले नसेल, तर निवडणुकीपूर्वी करा ऑनलाइन अर्ज


भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक 2024 जाहीर केले आहे. ही निवडणूक 7 टप्प्यात पूर्ण होणार असून पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिल रोजी होणार आहे. अंतिम टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार असून, 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीत सर्वांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे.

मात्र, काही लोकांना मतदार ओळखपत्राबाबत अडचणी येत आहेत. तुम्हालाही मतदार कार्डाशी संबंधित समस्या असल्यास काळजी करू नका. तुम्ही मतदार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकता. जर तुम्ही अद्याप मतदार झाला नसाल, तर तुम्ही ऑनलाइन अर्जही करू शकता.

ज्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट होतील, त्यांनाच निवडणुकीत मतदान करता येणार आहे. त्यामुळे तुमचे किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तुम्ही तपासावे. मतदार यादीतील नाव तपासणे, मतदार कार्ड डाऊनलोड करणे, नवीन मतदार कार्ड बनवणे आदी कामे ऑनलाइन करता येतील.

मतदार कार्ड हे महत्त्वाचे दस्तऐवज आहे, जे नागरिकांना निवडणुकीत सहभागी होण्याचा अधिकार देते. भारत निवडणूक आयोग (ECI) मतदार कार्ड जारी करणे आणि मतदार यादी राखण्यासाठी जबाबदार आहे.

ECI ने मतदारांसाठी अनेक ऑनलाइन सेवा सुरू केल्या आहेत, ज्यात मतदार कार्ड डाउनलोड करणे आणि मतदार यादीत नावे समाविष्ट करणे समाविष्ट आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलला (https://voters.eci.gov.in) भेट देऊन तुम्ही अनेक ऑनलाइन सुविधांचा लाभ घेऊ शकता.

मतदार यादीतील नाव कसे तपासायचे?

  • तुम्ही मतदार यादीतील तुमचे नाव ऑनलाइन तपासू शकता. त्यासाठी या लिंकवर क्लिक करा (https://electoralsearch.eci.gov.in/).
  • तुम्हाला तुमचा EPIC क्रमांक आठवत असेल, तर तो टाका आणि शोधा.
  • तुम्हाला EPIC क्रमांक आठवत नसल्यास, दुसरा पर्याय निवडा, तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि शोधा.
  • टाकलेल्या माहितीनुसार, तुमचे नाव मतदार यादीत नोंदवले असल्यास ते दिसेल.

कसे डाउनलोड करावे मतदार कार्ड

  • मतदार कार्ड डाउनलोड करण्यासाठी, निवडणूक आयोगाच्या मतदार सेवा पोर्टलवर जा (https://voters.eci.gov.in/).
  • ‘E-EPIC डाउनलोड करा’ या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा EPIC क्रमांक (मतदार आयडी क्रमांक) किंवा फॉर्म क्रमांक प्रविष्ट करा.
  • ‘OTP विनंती करा’ वर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर OTP येईल.
  • OTP प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करा.
  • तुमचे e-EPIC (डिजिटल वोटर कार्ड) डाउनलोड केले जाईल.

लक्षात ठेवा मतदार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी मोबाईल क्रमांकाची मतदार कार्डावर आधीपासूनच नोंदणी केलेली असावी. मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसल्यास मतदार कार्ड डाउनलोड होणार नाही. मोबाईल नंबर नोंदणी करण्यासाठी, तुम्ही फॉर्म 8 द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

मतदार यादीत नाव जोडण्याची ऑनलाइन प्रक्रिया

  • आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी, आपल्याला मतदार सेवा पोर्टलवर जावे लागेल.
  • येथे फॉर्म्स विभागात, सामान्य मतदारांसाठी नवीन नोंदणीच्या पर्यायामध्ये फॉर्म 6 वर क्लिक करा.
  • आता ऑनलाइन फॉर्म 6 काळजीपूर्वक भरा.
  • तुमचे नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता इत्यादी माहिती एंटर करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • ‘सबमिट’ वर क्लिक करा.

अर्ज केल्यानंतर, अर्ज क्रमांक तयार होईल, तो सुरक्षित ठेवा. जर तुमच्या फॉर्ममध्ये कोणतीही चूक नसेल आणि सर्वकाही बरोबर राहिल्यास तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. वयाच्या पडताळणीसाठी आवश्यक कागदपत्रांपैकी जन्म प्रमाणपत्र, दहावीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.

याशिवाय ओळखपत्रासाठी आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदी आवश्यक असतील तर ॲड्रेस प्रूफसाठी वीज बिल, रेशनकार्ड आदी आवश्यक असतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास तुम्ही निवडणूक आयोगाच्या हेल्पलाइन क्रमांकावर (1950) कॉल करू शकता.