जर तुम्ही देखील Vodafone Idea कंपनीचे प्रीपेड यूजर असाल, तर कंपनीने तुमच्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. या स्वस्त प्लॅनची किंमत 169 रुपये आहे, तुम्हाला या प्लॅनचे काय फायदे होतील? ते आम्ही तुम्हाला सांगतो.
Vi 169 Plan : लाँच झाला 169 रुपयांचा स्वस्त प्लॅन, 3 महिन्यांसाठी मोफत पाहा Hotstar
Vi 169 प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, या प्रीपेड प्लॅनसह, Vodafone Idea च्या प्रीपेड वापरकर्त्यांना 8 GB हाय-स्पीड डेटाचा लाभ मिळेल. हा एक डेटा प्लान आहे, याचा अर्थ या प्लानमध्ये तुम्हाला कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळणार नाही.
व्हॅलिडिटीबद्दल बोलायचे झाले तर, Vodafone Idea ने लॉन्च केलेला हा नवीन प्लान 30 दिवसांची वैधता देते. लक्षात घ्या की 30 दिवसांनंतर, तुमचा मुख्य प्लॅन सक्रिय असला तरीही, हा डेटा प्लॅन कालबाह्य होईल.
OTT प्रेमींना हा 169 रुपयांचा Vi प्लॅन आवडेल. या प्लॅनसह, तुम्हाला 30 दिवसांसाठी नाही, तर 3 महिन्यांसाठी मोफत Disney+ Hotstar मोबाइलमध्ये प्रवेश देखील दिला जाईल.
Reliance Jio कडे 169 रुपयांचा प्लॅन नाही, पण त्यात Jio 148 चा प्लान नक्कीच आहे. या कमी किमतीच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 10 GB हाय-स्पीड डेटा मिळतो. या व्यतिरिक्त, तुम्हाला या प्लॅनसह 12 OTT ॲप्सचा लाभ मिळतो.
एअरटेलचा देखील 169 रुपयांऐवजी 148 रुपयांचा प्लॅन आहे. 15 GB डेटा असलेला हा प्लॅन तुमच्या मुख्य प्लॅनपर्यंत टिकेल, याशिवाय तुम्हाला या प्लॅनसह 20 पेक्षा जास्त OTT ॲप्सचा लाभ मिळेल.