या कारणांमुळे मुले देखील पडू शकतात हृदयविकाराला बळी, अशा प्रकारे करा त्यांचे संरक्षण


हृदयविकाराचा झटक्याने बळी पडणाऱ्यांचा आकडा भारतात झपाट्याने वाढत आहे. गैर-संसर्गजन्य असूनही लोक सतत या आजाराला बळी पडत आहेत. आता लहान मुलांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरात आणि तेलंगणामध्ये 15 वर्षांखालील मुलांना हृदयविकाराचा झटका आला होता. दोन्ही घटनांमध्ये मृत्यू झाला. अशा घटनांमुळे चिंता वाढते. या प्रकरणांशिवाय इतरही अशी प्रकरणे पाहिली आहेत. अशा परिस्थितीत मुलांना हृदयविकारांपासून वाचवणे गरजेचे आहे. मुलांमध्ये हृदयविकाराचा धोका का वाढत आहे, त्याचबरोबर सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत आणि ते कसे टाळायचे? ते जाणून घेऊया.

डॉक्टरांच्या मते, काही प्रकरणांमध्ये मुलांना जन्मापासूनच हृदयसंबंधित आजार असतात. जेव्हा मूल आईच्या पोटात असते तेव्हा ते मूल जन्मजात हृदयसंबंधित आजाराला बळी ठरते. यापैकी, हृदयाला छिद्र आणि काही हृदयविकारांची प्रकरणे अधिक वेळा दिसतात. या रोगांमुळे, मुलांच्या हृदयाच्या झडपा आणि रक्तवाहिन्या प्रभावित होतात. अनेक प्रकरणांमध्ये, पालकांना हे माहित नसते की मुलाला हा आजार आहे आणि मूल हृदयविकाराच्या झटक्याचे बळी ठरते. याशिवाय लहान मुलांमध्ये हृदयविकाराचे अनेक घटक असतात.

वाढता लठ्ठपणा
मुलांमध्ये हृदयविकाराचे वाढता लठ्ठपणा हेही एक प्रमुख कारण आहे. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे, जो हृदयविकारासाठी मोठा धोका आहे. याशिवाय मुलांमध्ये मैदानी खेळ खेळण्याचा कमी झालेला कल, मानसिक ताण, रक्तदाब वाढणे हीही हृदयविकाराची कारणे आहेत.

मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे

  • ओठांजवळ निळ्या खुणा
  • श्वसनविषयी दाह, फुफ्फुसातील दाह
  • थोडे चालल्यावरही दम लागणे
  • योग्यरित्या विकसित न होणे
  • चक्कर येणे
  • छातीत दुखणे

लक्षणे दिसल्यास काय करावे
जर मुलाला छातीत दुखत असेल आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्या. या बाबतीत गाफील राहू नका. या दरम्यान मुलाचे बीपी देखील तपासा.

कसे करावे संरक्षण

  • मुलाच्या जन्माच्या वेळी हृदयाच्या सर्व चाचण्या करा.
  • मुलांना जंक फूड खाण्यापासून थांबवा
  • मुलांची जीवनशैली योग्य ठेवा
  • मुलांना मैदानी खेळासाठी प्रवृत्त करा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही