Yodha Vs Shaitaan Box Office : ‘शैतान’वर किती पडला ‘योद्धा’चा प्रभाव? सिद्धार्थ मल्होत्राच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई


पहिल्या 7 दिवसांत अजय देवगणच्या ‘शैतान’ चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 79.75 कोटींची कमाई केली. त्याच्या 8व्या दिवशी सिद्धार्थ मल्होत्रा ​​’योद्धा’च्या रुपात थिएटरमध्ये आला आहे. ‘योद्धा’ रिलीज होण्याआधीच हा सिनेमा रिलीज झाल्यावर ‘शैतान’च्या कमाईवर परिणाम होणार असल्याचं बोलले जात होते. अशा परिस्थितीत 15 मार्चला या दोन्ही चित्रपटांची कामगिरी कशी झाली हे जाणून घेऊया.

आधी अजयच्या शैतान या चित्रपटाबद्दल बोलू. या चित्रपटाने 8 मार्च रोजी बॉक्स ऑफिसवर 14.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटाने चांगली कामगिरी केली. मात्र, त्यानंतर कमाईत थोडी घट झाली होती.पण, चित्रपटाने चांगली कमाई सुरूच ठेवली. रिलीजच्या 8 दिवसानंतरही हा ट्रेंड कायम आहे. SACNILC च्या रिपोर्टनुसार, 8 व्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या चित्रपटाने 4.50 कोटींचा व्यवसाय केला आहे आणि सिद्धार्थच्या ‘योद्धा’ला टक्कर देताना दिसत आहे. मात्र, सध्या हे आकडे अंदाजे आहेत. नेमकी आकडेवारी समोर आल्यानंतर त्यात काही बदल दिसून येतील.

15 मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला सिद्धार्थ मल्होत्राचा ‘योद्धा’ चित्रपट पहिल्या दिवशी फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाने केवळ 4.25 कोटींचा गल्ला जमवला आहे. मात्र, दोन्ही चित्रपटांचे आकडे बघितले तर ‘शैतान’ रिलीज होऊन 8 दिवस उलटूनही त्याची मोहिनी कायम आहे. त्याचबरोबर ‘योद्धा’चा या चित्रपटावर विशेष प्रभाव दिसून आलेला नाही. सिद्धार्थच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी फारच कमी कमाई केली आहे.

मात्र, शनिवार आणि रविवारी ‘योद्धा’च्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात सिद्धार्थसोबत दिशा पटनी आणि राशि खन्ना देखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर ओझा आणि सागर आंब्रे यांनी केले आहे.