Shaitaan : 7 दिवसांत अजय देवगणने आपल्याच या 5 चित्रपटांना धूळ पछाडले, ‘शैतान’ पोहचला 100 कोटींच्या जवळ


बॉलीवूड अभिनेता अजय देवगण शैतान या चित्रपटातून त्याच्या जुन्या चित्रपटांना पछाडताना दिसत आहे. 8 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये चांगलीच पकड राखली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सतत थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. अजयशिवाय शैतान या चित्रपटात आर माधवनचीही खूप चर्चा होत आहे. असे मानले जाते की त्याचे पात्र केवळ शक्तिशालीच नाही, तर खूप भीतीदायक देखील आहे. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

शैतानच्या सातव्या दिवसाचे आकडेही समोर आले आहेत. मात्र, दिवसेंदिवस उत्पन्नात घट होत आहे. पण वीकेंडला हा चित्रपट पुन्हा धमाका करेल, अशी अपेक्षा आहे. Sacknilk च्या ताज्या अहवालानुसार, शैतानने रिलीजच्या सातव्या दिवशी 5.75* कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ही आकडेवारी प्राथमिक असली, तरी त्यात आणखी वाढ होऊ शकते. यासह शैतानचे एकूण कलेक्शन आता 79.75 कोटींवर पोहोचले आहे.

यासोबतच अजयच्या चित्रपटाने त्याच्याच शेवटच्या 5 फ्लॉप चित्रपटांचा रेकॉर्डही मोडला आहे. अजयचा ॲक्शन जॅक्सन हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. हा त्याचा फ्लॉप चित्रपट होता, ज्याने 57.78 कोटींचा व्यवसाय केला होता. 2015 मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. पण कमाईच्या बाबतीत तो काही विशेष दाखवू शकला नाही. दृश्यमने 67.13 कोटी रुपये जमा केले होते. अजय देवगणचा बादशाहो हा चित्रपट सरासरी चित्रपट होता. 78.1 कोटी रुपये कमावले होते. थिएटरमध्ये रनवे 34 बेकार आपटला होता. हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला आणि त्याचे कलेक्शन सुमारे 32 कोटी रुपये होते.

अजय देवगणचा आणखी एक चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. ज्याचे नाव थँक गॉड होते. हा चित्रपट वादांनी वेढला गेला, ज्याचा थेट परिणाम चित्रपटाच्या कमाईवर झाला आणि तो फ्लॉप ठरला. या चित्रपटाने 34.89 कोटींचा व्यवसाय केला. तसे पाहिले तर शैतानने पाचही चित्रपटांमध्ये बाजी मारली आहे. शैतानही या वीकेंडला 100 कोटींचा आकडा गाठेल असा विश्वास आहे.