इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्याने महिलेला 6 महिने तुरुंगवास, तुम्हीही करू नका ती चूक


भारतात, जर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नाही, तर तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने सावित्री नावाच्या महिलेला आयटीआर न भरल्याप्रकरणी 6 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. भारताच्या प्राप्तिकर कायद्यात अशा तरतुदी आहेत, ज्यात तुम्ही ITR दाखल न केल्यास तुम्हाला 7 वर्षांपर्यंत तुरुंगात पाठवले जाऊ शकते.

ताजी केस दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाची आहे, जिथे आयकर कार्यालयाने एका महिलेविरुद्ध आयटीआर दाखल न केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती. महिलेने 2 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आयकर विवरणपत्र भरले नव्हते.

महिलेने 2013-14 या आर्थिक वर्षात 2 कोटी रुपये कमावले होते, त्यावर तिने 2 लाख रुपयांचा टीडीएस भरला होता. परंतु या उत्पन्नासाठी कोणताही आयटीआर दाखल केला नाही. अशा परिस्थितीत महिलेने तिच्या उत्पन्नाच्या केवळ एक टक्का कर भरला. तर या उत्पन्नावर कराची मागणी जास्त आहे.

तीस हजारी कोर्टात अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी मयंक मित्तल यांनी संपूर्ण प्रकरणाचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर महिलेला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आणि तिला 6 महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षाही ठोठावली. महिलेने दंड न भरल्यास तिला आणखी एक महिना तुरुंगात राहावे लागेल.

महिलेच्या याचिकेवर न्यायालयाने तिला 30 दिवसांच्या शिक्षेतून दिलासा देत जामीनही मंजूर केला. महिलेची इच्छा असेल, तर ती या निर्णयाला पुढे आव्हान देऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.

या संपूर्ण प्रकरणात विशेष सरकारी वकील अर्पित बत्रा यांचे म्हणणे आहे की, येथे करचुकवेगिरीच्या प्रकरणात दोषीला शिक्षा करणे महत्त्वाचे नव्हते, तर आयकर कायद्यातील या तरतुदीची उपयुक्तता सिद्ध करणे महत्त्वाचे होते. एवढेच नाही तर आयकर रिटर्न भरणे ही नागरिकांची जबाबदारी आहे, हे जाणून घेणेही त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे.

आयकर कायद्यानुसार तुमचे आयकर रिटर्न वेळेवर भरणे अनिवार्य आहे. असे न केल्यास तुम्हाला दंडासह तुरुंगवास भोगावा लागू शकतो.