या दिवसापासून सुरू होणार प्रभासच्या 100 कोटी बजेटच्या चित्रपटाचे शूटिंग


‘सालार’च्या यशानंतर प्रभास कायम चर्चेत आहे. सध्या त्याच्या नावावर एक-दोन नव्हे तर अनेक मोठे चित्रपट आहेत. ‘कल्की 2898 एडी’ या वर्षी प्रदर्शित होणार आहे. आता फक्त ‘सालार 2’, ‘स्पिरिट’ आणि ‘राजा साब’ उरले आहेत. तिन्ही चित्रपटांची घोषणा झाली आहे. अलीकडेच ‘कल्की 2898 एडी’चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर, तो संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘स्पिरिट’वर काम करण्यास सुरुवात करणार असल्याचे समोर आले आहे. पण दरम्यान, प्रभासच्या तिसऱ्या पिक्चरबाबत एक मोठे अपडेट मिळाले आहे. हा ‘सालार 2’ नाही आणि ‘स्पिरिट’ही नाही. हा त्याचा ‘द राजा साब’ आहे. 15 जानेवारीला त्याने या चित्रपटाची घोषणा केली होती.

प्रभासचा हा पॅन इंडिया चित्रपट असेल. दिग्दर्शक मारुती हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. त्याचा फर्स्ट लुकही समोर आला आहे. त्यामध्ये प्रभास लुंगी घातलेला दिसत होता. तेलुगु, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतही तो प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हा देखील एक भारी VFX चित्रपट असेल.

सध्या प्रभास ‘कल्की 2898 एडी’च्या स्पेशल डान्स नंबरसाठी टीमसोबत इटलीमध्ये आहे. तो दिशा पटनीसोबत एक खास डान्स सीक्वेन्स करणार आहे. आता याची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो ‘द राजा साब’च्या कामाला सुरुवात करणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबतचा अहवाल पिंकव्हिलामध्ये प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार प्रभास जून किंवा जुलैमध्ये ‘द राजा साब’चे शूटिंग सुरू करू शकतो. चित्रपटाचे शूटिंग वेळेत पूर्ण झाले, तर 2025 मध्ये संक्रांतीच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल, असे बोलले जात आहे.

‘राजा साब’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात प्रभासशिवाय मालविका मोहन, निधी अग्रवाल आणि ब्रह्मानंदम हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये प्रभास स्थानिक मॅसी अवतारात दिसणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचे चाहते प्रभासच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिग्दर्शक मारुतीसाठी गेली काही वर्षे त्याच्या चित्रपटांच्या बाबतीत फारशी चांगली राहिलेली नाहीत. मात्र, आता तो प्रभाससोबत काहीतरी मोठे करण्याचा विचार करत आहे. यानंतर तो संदीप रेड्डी वंगा यांच्या ‘स्पिरिट’वर काम सुरू करू शकतो. तर, प्रभासचा ‘द राजा साब’ हा चित्रपट 100 कोटींच्या बजेटमध्ये बनत आहे.