एअरटेल आणि रिलायन्स जिओ अशा दोन कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांना वायरलेस ब्रॉडबँड सेवेचा लाभ देतात. तुम्हालाही Airtel Xstream AirFiber किंवा Jio AirFiber चे नवीन कनेक्शन घरबसल्या मिळवायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आधीच माहिती असायला हवी.
Jio AirFiber vs Airtel AirFiber : किंमतीपासून फायद्यांपर्यंत, कोणाची एअर फायबर सेवा आहे सर्वोत्तम ?
नवीन एअरफायबर कनेक्शन घेण्यासाठी काय करावे लागेल, कोणत्या शहरांमध्ये Airtel आणि Jio AirFiber सेवा उपलब्ध आहे आणि दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनच्या किंमतीची माहिती येथे देत आहोत.
रिलायन्स जिओच्या एअरफायबर सेवेचा लाभ सध्या फक्त अहमदाबाद, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पुणे, हैदराबाद आणि मुंबई या शहरांमध्ये उपलब्ध आहे.
तुम्हालाही घरबसल्या Jio AirFiber कनेक्शन मिळवायचे असेल, तर तुम्ही तीन प्रकारे अर्ज करू शकता. पहिला मार्ग, तुम्ही 60008-60009 वर मिस्ड कॉल देऊ शकता. दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही रिलायन्स जिओच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन एअरफायबर कनेक्शनसाठी अर्ज करू शकता. तिसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या घराजवळील Jio स्टोअरला भेट देऊन नवीन कनेक्शनसाठी अर्ज करू शकता. बुकिंग करताना तुम्हाला काही बुकिंग रक्कमही भरावी लागेल.
Jio AirFiber प्लॅनची किंमत 599 रुपयांपासून सुरू होते आणि 3,999 रुपयांपर्यंत जाते. 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 30Mbps स्पीड, अमर्यादित डेटा, 550 हून अधिक टीव्ही चॅनल, Sony Liv, Disney Plus Hotstar, Zee5सह 11 OTT ॲप्सचा लाभ मिळेल.
899 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100Mbps स्पीड, 550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनल, अमर्यादित डेटा याशिवाय तुम्हाला Disney Plus Hotstar, Sony Liv, Zee5सह 11 OTT ॲप्सचा लाभ मिळेल.
1199 रुपयांच्या प्लॅनमध्ये, 100Mbps स्पीड व्यतिरिक्त, तुम्हाला अमर्यादित डेटा आणि 550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलचा लाभ मिळतो. याशिवाय, कंपनी Netflix, Amazon प्राइम व्हिडिओसह एकूण 13 OTT ॲप्सचा लाभ देते.
1499 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबीपीएस स्पीड आहे, 2499 रुपयांचा प्लॅन 500 एमबीपीएस स्पीड आणि 3999 रुपयांचा प्लान 1Gbps स्पीड ऑफर करतो. या तिन्ही प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा, 550 हून अधिक टीव्ही चॅनेल आणि 13 OTT ॲप्सचा लाभ दिला जातो.
एअरटेलची ही सेवा वाय-फाय 6 तंत्रज्ञानावर काम करते, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एअरफायबर सेवेद्वारे 64 पर्यंत डिव्हाइस कनेक्ट करू शकता. एअरफायबर प्लॅनची किंमत 699 ते 999 रुपये आहे.
699 रुपयांचा प्लॅन 40Mbps स्पीड देईल, 799 रुपयांचा प्लान 100Mbps स्पीड देईल आणि 999 रुपयांचा प्लान 100Mbps स्पीड देईल. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या प्लॅनच्या किंमतीमध्ये 18 टक्के जीएसटी समाविष्ट नाही. याचा अर्थ असा की प्लॅनच्या किंमतीव्यतिरिक्त तुम्हाला स्वतंत्रपणे 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.
जर एखाद्या ग्राहकाने संपूर्ण वर्षाचा प्लान एकाच वेळी खरेदी केला, तर 1000 रुपये इन्स्टॉलेशन शुल्क आकारले जाणार नाही. तुम्ही 6 महिन्यांचा प्लॅन देखील निवडू शकता, परंतु यासोबत तुम्हाला रु. 2500 ची एकवेळ परत करण्यायोग्य सुरक्षा जमा करावी लागेल. एअरटेलची ही वायरलेस सेवा सध्या फक्त दिल्ली आणि मुंबई, पुण्यामध्ये उपलब्ध आहे, कंपनी लवकरच इतर शहरांसाठीही ही सेवा सुरू करू शकते.
जर तुम्हाला एअरटेल एअरफायबर कनेक्शन घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला जवळच्या एअरटेल स्टोअरमध्ये जावे लागेल. तुम्हाला एअरटेल स्टोअरमध्ये जाऊन नवीन कनेक्शनसाठी विनंती करावी लागेल.