शनिदेवाला पत्नीने का दिला होता शाप, त्यामुळे शनिदेवाचे मस्तक कायमचे झाले नतमस्तक?


असे मानले जाते की शनीच्या दशेमुळे व्यक्तीच्या जीवनात अशुभ आणि हानीकारक गोष्टी घडू लागतात. असे म्हणतात की शनिदेव जर कोणावर रागावला, तर त्याचे रूपांतर राजामधून गरीब बनवतो आणि जर तो एखाद्यावर प्रसन्न झाला, तर त्याला अत्यंत श्रीमंत बनवतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाला मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानले जाते. त्यामुळे शनिदेवाचा कोप टाळण्यासाठी लोक शनिवारी त्यांची पूजा करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.

शनिदेव हे श्रीकृष्णाचे परम भक्त होते, ते लहानपणापासूनच श्रीकृष्णाची पूजा करत असत. पौराणिक कथेनुसार, शनिदेवाची पत्नी देखील एक तेजस्वी, ज्ञानी आणि एकनिष्ठ स्त्री होती. लग्नानंतरही शनिदेव नेहमी कृष्णाच्या भक्तीत तल्लीन राहिले. एका रात्री चित्ररथ ऋतुस्नान करून पुत्रप्राप्तीसाठी शनिदेवाकडे गेली. यावेळीही शनिदेव भगवान श्रीकृष्णाचे ध्यान करीत होते. त्याने बायकोकडे ढुंकूनही पाहिले नाही. हा अपमान मानून चित्ररथाने शनिदेवाला शाप दिला आणि सांगितले की, आजपासून तुम्ही ज्याला पाहाल त्याचा नाश होईल.

पत्नी चित्ररथचे शब्द ऐकून शनिदेवाचे लक्ष भंगले आणि त्यांना आपल्या चुकीचा पश्चात्ताप झाला, ज्यासाठी शनिदेव आपल्या पत्नीची माफी मागू लागले. शनिदेवाच्या पत्नीकडे हा शाप तोडण्याचा कोणताही मार्ग नव्हता, यामुळे शनिदेव नेहमी नतमस्तक होऊन चालतात. जेणेकरून त्यांची नजर कोणावरही पडू नये. शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या नजरेला नजर मिळवू नये, असाही शास्त्रात उल्लेख आहे. त्याचबरोबर शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी त्यांची पूजा, जप, तपश्चर्या आणि ध्यान रोज करावे. तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे.