हे आहेत अजय देवगणचे जगभरात सर्वाधिक कमाई करणारे पाच चित्रपट, ‘शैतान’च्या माध्यमातून मोडेल का त्याचाच विक्रम ?


‘गोलमाल’, ‘सिंघम’, ‘आक्रोश’ सारखे चित्रपट देणारा अजय देवगण आता एका नव्या चित्रपटातून लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा नवा चित्रपट ‘शैतान’ आज चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून हा चित्रपट लोकांना आवडेल आणि चांगली कमाईही करेल असे बोलले जात आहे. दरम्यान, आम्ही तुम्हाला अजयच्या जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांबद्दल सांगणार आहोत.

तान्हाजी- या यादीतील पहिला चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तान्हाजी’ आहे. अजयच्या कारकिर्दीतील हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट आहे. या चित्रपटाने जगभरात 367.65 कोटींचा व्यवसाय केला होता.

दृष्यम 2- ‘दृश्यम 2’ हा अजयचा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट आहे. 2022 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने 345.05 कोटींचा व्यवसाय केला होता. त्याच्या चित्रपटाचा पहिला भागही लोकांना खूप आवडला होता.

गोलमाल अगेन- अजयच्या ‘गोलमाल’ फ्रँचायझीच्या सर्वच चित्रपटांना लोकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. 2017 मध्ये, जेव्हा या फ्रँचायझी ‘गोलमाल अगेन’चा रिलीज झाला, तेव्हा त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला आणि जगभरात 311.18 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

टोटल धमाल- हा पिक्चर 2019 मध्ये रिलीज झाला होता. अजयसोबत अनिल कपूर, अर्शद वारसी, माधुरी दीक्षित, जावेद जाफरी, बोमन इराणी यांसारखे स्टार्सही दिसले होते. या चित्रपटाने चांगली कमाईही केली होती. जगभरात 228.27 कोटी रुपये कमावले होते.

गंगूबाई काठियावाडी- आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ नावाचा चित्रपट 2022 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजय देवगणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट खूप चर्चेत आला होता. अजय आणि आलिया या दोघांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटाने जगभरात 209.7 कोटींचा व्यवसाय केला होता.

येथे आम्ही तुम्हाला सांगतो की या यादीत RRRचा समावेश करण्यात आलेला नाही, कारण त्या चित्रपटात अजयची भूमिका खूपच लहान होती. मात्र, आता शैतान कशी कामगिरी करतो आणि आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या पाच चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.