Mini Solar AC: ना बॅटरी, ना पेट्रोल होणार खर्च, सूर्यप्रकाशावर चालेल गाडीतील एसी


उन्हाळ्यात कारमधून प्रवास करणे थोडे कठीण असते. कडक उन्हामुळे गाडीचे तापमान खूप वाढते आणि ते असह्य होते. या समस्येवर मात करण्यासाठी अनेकजण कारचा एसी वापरतात, मात्र एसी चालवल्याने कारच्या ऊर्जेवर दबाव येतो. याचा सरळ अर्थ असा की एसी चालला, तर जास्त पेट्रोल आणि डिझेल खर्च होईल. त्यामुळे प्रदूषणही वाढेल. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला मिनी सोलर एसीबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला थंड हवा देईल.

एक नवीन मिनी सोलर एसी बाजारात आला आहे, जो कारला थंड ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे. यामुळे तुमची कार थंड तर होईलच, पण पर्यावरणासाठीही चांगली आहे. हा सौरऊर्जेवर चालणारा मिनी एसी आहे. हे कसे काम करते आणि त्याची किंमत किती आहे याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

हा एसी लहान सोलार पॅनल आणि पंख्यांचा बनलेला आहे. सोलर पॅनल सूर्यप्रकाशापासून वीज निर्माण करते आणि ही वीज पंखे चालवते. पंखे चालतात तेव्हा गाडीच्या आत थंड हवा येते. तुम्ही तो कारच्या आरशावर टांगू शकता. त्याच्या सोलर पॅनलचा काही भाग कारच्या बाहेर राहील, तर कूलरचा काही भाग कारच्या आत राहील.

मिनी सोलर एसीचे फायदे
पर्यावरणपूरक: हा एसी पेट्रोल किंवा डिझेलपासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर चालत नाही, त्यामुळे प्रदूषण होत नाही.

बचत: हा एसी विजेवर चालत नाही, त्यामुळे कारची बॅटरी संपणार नाही आणि ऊर्जेची बचत होईल.

पोर्टेबल: हा एसी खूपच लहान आणि हलका आहे, त्यामुळे तो सहजपणे कुठेही घेऊन जाता येतो.

सुलभ इन्स्टॉलेशन: हे स्थापित करणे खूप सोपे आहे. तो कारच्या आरशावर टांगला जाऊ शकतो.

तुमची कार थंड ठेवण्यासाठी तुम्ही नवीन मार्ग शोधत असाल, तर मिनी सोलर एसी हा एक चांगला पर्याय असू शकतो. हा मिनी सोलर एसी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर 4,415 रुपयांना उपलब्ध आहे.