यशस्वी जैस्वालने केला आणखी एक कारनामा, कसोटी क्रमवारीत मिळवले हे स्थान, विराट कोहलीही राहणार मागे !


यशस्वी जैस्वाल याचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या 22 वर्षीय खेळाडूने आता जे केले आहे, ज्याचा शेकडो खेळाडू विचारही करू शकत नाही. खरं तर, हा डावखुरा फलंदाज आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये पोहोचला आहे. मागच्या वर्षीच पदार्पण करणारा यशस्वी जैस्वाल इतक्या लवकर टॉप 10 मध्ये पोहोचेल असे कुणालाही वाटले नव्हते. मात्र जैस्वालच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट खेळीने त्याला या महान स्थानापर्यंत पोहोचवले आहे.

यशस्वी जैस्वाल 727 रेटिंग गुणांसह ICC कसोटी क्रमवारीत 10 व्या स्थानावर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात हा खेळाडू 12 व्या स्थानावर होता, पण आता यशस्वीने दोन फलंदाजांना मागे टाकून पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. आता यशस्वी आणि विराटमध्ये फारसा फरक राहिलेला नाही. विराट कोहली 744 रेटिंग गुणांसह 8व्या क्रमांकावर आहे. म्हणजे यशस्वी विराटपासून केवळ 17 रेटिंग पॉइंट्स दूर आहे. धरमशालातील त्याची उत्कृष्ट कामगिरी त्याला विराटच्या जवळ किंवा त्याच्या पुढे नेऊ शकते.

आयसीसी कसोटी क्रमवारीत केन विल्यमसन अव्वल स्थानावर कायम आहे. जो रूट दुसऱ्या स्थानावर आला आहे, जो गेल्या आठवड्यात तिसऱ्या स्थानावर होता. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर स्टीव्ह स्मिथची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. डॅरेल मिशेल चौथ्या आणि बाबर आझम पाचव्या स्थानावर आहे. उस्मान ख्वाजा सहाव्या तर दिमुथ करुणारत्ने सातव्या स्थानावर आहे. आयसीसी क्रमवारीत सर्वात मोठा तोटा मार्नस लॅबुशेनला झाला आहे, जो 8 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर घसरला आहे.

यशस्वी जैस्वालने गेल्या वर्षी जुलैमध्ये कसोटी पदार्पण केले होते. या डावखुऱ्या फलंदाजाने आतापर्यंत केवळ 8 कसोटी सामने खेळले आहेत आणि अशा काही सामन्यांमुळे तो कसोटी क्रमवारीत पहिल्या 10 मध्ये पोहोचला आहे. जैस्वालने आतापर्यंत 69.35 च्या उत्कृष्ट सरासरीने 971 धावा केल्या आहेत आणि त्याच्या बॅटने एक शतक आणि दोन द्विशतके झळकावली आहेत. हे आकडे खरोखरच आश्चर्यकारक आहेत आणि त्यामुळेच आयसीसी कसोटी क्रमवारीत जैस्वालची कीर्ती दिसून आली.