Flipkart UPI : आता Flipkart द्वारे देखील करता येणार UPI पेमेंट, Google Pay आणि PhonePeशी स्पर्धा


ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart ने UPI सेवा ‘Flipkart UPI’ लाँच केली आहे. ई-कॉमर्स कंपनीने ॲक्सिस बँकेच्या सहकार्याने ही सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा फक्त अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीच जारी करण्यात आली आहे. सुपरकॉइन्स, कॅशबॅक, माइलस्टोन बेनिफिट्स आणि ब्रँड व्हाउचर यांसारखे फायदे फ्लिपकार्ट UPI मध्ये उपलब्ध असतील. कंपनी गेल्या वर्षापासून आपल्या UPI सेवेची चाचणी करत होती. आता ते सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आले आहे.

नवीन UPI ​​सेवा फ्लिपकार्टच्या ग्राहकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. फ्लिपकार्टवर खरेदी करताना, त्यांना पेमेंट करण्यासाठी इतर ॲप्लिकेशनवर जाण्याची गरज नाही. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म कंपनीने आपल्या ग्राहकांना स्वतःची UPI सेवा प्रदान करणे, हे एक मोठे पाऊल आहे. Flipkart UPI आल्यानंतर बाजारात सध्या असलेल्या Google Pay आणि PhonePe सारख्या कंपन्यांच्या अडचणी वाढू शकतात.

UPI सेवा विकसित करणारी संस्था नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) देखील काही कंपन्यांवरील UPI चे अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. फ्लिपकार्टने सांगितले की, UPI पेमेंटद्वारे, ग्राहक फ्लिपकार्ट मार्केटप्लेसमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापारी व्यवहारांचे फायदे घेऊ शकतात.

Flipkart ची UPI सेवा 2022 च्या उत्तरार्धात सर्वात मोठी UPI प्लेयर PhonePe सह Flipkart च्या विभक्त झाल्यानंतर आली आहे. “ग्राहक आता @fkaxis हँडलसह UPI साठी नोंदणी करू शकतात आणि Flipkart ॲप वापरून निधी हस्तांतरण आणि चेकआउट पेमेंट करू शकतात, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे.

सध्या फक्त Android वापरकर्ते Flipkart UPI वापरू शकतात. या लिंकवर क्लिक करून तुम्ही फ्लिपकार्ट ॲपवर UPI नोंदणी करू शकता. सध्या कंपनीने आयफोन वापरकर्त्यांसाठी ही सेवा जारी केलेली नाही. फ्लिपकार्टची नवीन सेवा क्लाउड आधारित आहे, जी लोकांना चांगला अनुभव देईल.