Fraud Alert : पोलिस म्हणून फोन करून सांगतील, तुमच्या नावावर मिळाले आहे अवैध पार्सल, तर त्वरित करा हे काम


गृहमंत्रालयाने जनतेला बनावट पोलिस अधिकाऱ्यांबाबत सावध केले आहे. आजकाल फसवणुकीचा नवा प्रकार सुरू आहे. घोटाळेबाज पोलिस किंवा सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करतात आणि म्हणतात की तुमच्या नावाचे एक पार्सल जप्त केले गेले आहे आणि त्यात अवैध माल आहे. यानंतर, काही प्रश्नांची उत्तरे मागितली जातात, ज्यामध्ये वापरकर्त्यांचे वैयक्तिक तपशील विचारले जातात आणि त्याचा फायदा घेतला जातो.

तुमच्यासोबतही अशीच काही फसवणूक झाली असेल, तर वेळीच सावध व्हा. अशा कोणत्याही फोन कॉलवर विश्वास ठेवू नका किंवा तुमचे वैयक्तिक तपशील शेअर करू नका. या तपशीलांमध्ये तुमचे बँक तपशील देखील समाविष्ट आहेत. तसेच, अशा संशयास्पद फोन कॉलची त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार करा.

या कुरिअर घोटाळ्याची माहिती गृह मंत्रालयाकडून हाताळल्या जाणाऱ्या सायबर दोस्त या सोशल मीडिया अकाउंटवर देण्यात आली आहे.

  • फसवणूक करणारे लोक पोलिस किंवा एनसीआरबी अधिकारी म्हणून भासवतात.
  • हे लोक खोटे बोलतात की तुमच्या पार्सल/कुरियरमध्ये बेकायदेशीर वस्तू आढळून आल्या आहेत.

अशा परिस्थितीत आपण काय करावे?

  • पोलीस/NCRB कडून अनपेक्षित फोन कॉल्सपासून सावध रहा.
  • कॉलर खरा आहे की खोटा हे स्वतः शोधण्याचा प्रयत्न करा.
  • तुमची वैयक्तिक किंवा बँकेशी संबंधित माहिती फोनवर देऊ नका.
  • तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही अशा प्रकरणांबद्दल सतर्क करा.

तुम्हाला असा फोन आला, तर तुम्ही सायबर क्राईमच्या https://cybercrime.gov.in या वेबसाइटवर तत्काळ तक्रार नोंदवू शकता. याशिवाय 1930 नंबर डायल करूनही अशा प्रकरणांची माहिती दिली जाऊ शकते.