जेव्हा अर्जुन कपूरने काका अनिल कपूरची नक्कल करून मिळवला होता करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट


अर्जुन कपूरचा पहिला चित्रपट ‘इशकजादे’ हा त्याच्या करिअरमधील आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट मानला जातो. नुकतेच एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल आणि त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलताना अर्जुन कपूरने सांगितले की, त्याने काका अनिल कपूर यांची नक्कल करून हा चित्रपट मिळवला होता. वास्तविक, ‘कॉफी विथ करण’ या शोमधील अर्जुन कपूर आणि रणबीरची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अर्जुन कपूरला हा चित्रपट कसा मिळाला, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ऑडिशनच्या आधारे त्याला ‘इशकजादे’ हा चित्रपट मिळाल्याचे अभिनेत्याने सांगितले.

अर्जुन कपूरने सांगितले की, जेव्हा तो ऑडिशन देत होता, तेव्हा त्याने काकांची नक्कल करत तो सीन केला होता. त्याने अनिल कपूरसारखा अभिनय केला. याशिवाय त्याने अनिल कपूर आणि सलमान खानसोबतही अभिनय केल्याचे सांगितले. निर्मात्याला दोन्ही सुपरस्टारची कॉपी केलेले अभिनय आवडला आणि अर्जुनला फायनल केले. अशाप्रकारे अर्जुन कपूरने काकांची नक्कल करत करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट मिळवला. या चित्रपटात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा दिसली होती. या चित्रपटातील दोघांचा रोमान्स खूप आवडला होता. चित्रपटातील गाणीही खूप ऐकली होती.

अर्जुन कपूरचा ‘गुंडे’ सेमी हिट तर ‘2 स्टेट्स’ हिट ठरला होता. याशिवाय ‘तेवर’, ‘नमस्ते इंग्लंड’, ‘पानीपत’, ‘संदीप और पिंकी फरार’ या चित्रपटांमध्येही तो दिसला आहे. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच अजय देवगण स्टारर सिंघम अगेन या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे, जो पाहून अर्जुन कपूर खलनायक बनून खळबळ माजवणार असल्याचे दिसते.