शाहरुख खान आणि सुहाना खान हे दोघेही बापलेक ‘किंग’ चित्रपटात पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. दरम्यान, हा चित्रपट रखडल्याची बातमी आली होती. पण आता पुन्हा एकदा या चित्रपटाचे अपडेट आले आहे. रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान आणि सुहाना खान दोघेही त्यांच्या घरी मन्नत चित्रपटासाठी ॲक्शन सीनसाठी ट्रेनिंग घेत आहेत. त्यांना परदेशी अॅक्शन तज्ञांकडून प्रशिक्षण दिले जात आहे. सुजॉय घोष या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. त्याने या चित्रपटासाठी उर्वरित कलाकारांनाही कास्ट करण्यास सुरुवात केली आहे.
शाहरुख खानच्या नवीन चित्रपट ‘किंग’चे मोठे अपडेट, सुहानासोबत सुरू केली गुपचूप तयारी!
‘किंग’ची निर्मिती शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि सिद्धार्थ आनंदची कंपनी मारफ्लिक्स करणार आहे. यासोबतच चित्रपटाचे स्क्रिप्ट सेशनही सुरू आहे. चित्रपटाचे जागतिक दर्जाचे ॲक्शन सीन बनवण्याची जबाबदारी पूर्णपणे सिद्धार्थ आनंदच्या खांद्यावर आहे. सुहाना खानने या चित्रपटासाठी खूप आधीपासून सराव सुरू केला आहे. ती वेगवेगळे ॲक्शन फॉर्म शिकत आहे. या चित्रपटाचे शूटिंग या वर्षी मे महिन्यापासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘किंग’ हा सुहाना खानचा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. याद्वारे ती मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. तिने गेल्या वर्षी झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या चित्रपटाद्वारे ओटीटीमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील सुहाना खानचा अभिनय प्रेक्षकांना फारसा आवडला नाही. तिला टीकेलाही सामोरे जावे लागले. 2023 हे वर्ष तिचे वडील शाहरुख खानसाठी खूप चांगले वर्ष ठरले. त्याच वर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले.
यामध्ये ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘डंकी’ यांचा समावेश होता. ‘जवान’ आणि ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. ‘किंग’ व्यतिरिक्त शाहरुख खानच्या इतर प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘पठाण 2’ साठी देखील चर्चेत आहे. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘पठाण 2’. या चित्रपटाचे शूटिंगही या वर्षी लवकरच सुरू होऊ शकते.