भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स तुम्हाला देईल परदेशातही गाडी चालवण्याची परवानगी, या देशात आहे परवानगी


दुचाकी आणि चारचाकी वाहने चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्याशिवाय गाडी चालवताना पकडले गेल्यास मोठा दंड भरावा लागतो. तसेच तुम्ही पोलिसांशी वाद घातल्यास तुमचे वाहनही जप्त केले जाऊ शकते.

देशात तसेच परदेशात वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी भारतातून मोठ्या संख्येने लोक नोकरीसाठी परदेशात जातात. तेथील कार्यालयात जाण्यासाठी लोकांना स्वतःचे वाहन चालवावे लागते आणि त्यासाठी वाहन चालविण्याचा परवानाही आवश्यक असतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही देशांबद्दल सांगत आहोत, जिथे फक्त भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स उपयोगी ठरू शकते.

भारतात बनवलेले स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, युनायटेड किंगडम, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका आणि स्वीडनमध्ये वैध आहे. तुम्ही नोकरी, शिक्षण किंवा टुरिस्ट व्हिसावर तेथे जात असाल, तर तुम्ही या देशांच्या रस्त्यावर गाडी चालवू शकता.

परदेशात जाणाऱ्या लोकांना हे माहीत असायला हवे की, तिथल्या रस्त्यावर वाहन चालवण्यापूर्वी त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स हा भारताच्या प्रादेशिक भाषेत नसून इंग्रजीत असावा. जर तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स प्रादेशिक भाषेत बनवला असेल, तर तो परदेशात वैध ठरणार नाही.

भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह परदेशात वाहन चालवण्यासाठी, तुम्हाला वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या कागदपत्रांची आवश्यकता असेल. अमेरिकेप्रमाणे तुमच्या I 94 फॉर्मची पडताळणी करावी लागेल. तसेच, काही देशांमध्ये तुम्हाला परमिट घ्यावे लागेल. त्यानंतरच तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह परदेशात गाडी चालवू शकता.