सूर्यदेवही झाले होते भगवान शंकराच्या कोपाचे बळी, जाणून घ्या या मागची कहाणी


हिंदू धर्मात भगवान शिवाला देवांचे देव महादेव म्हणतात. असे मानले जाते की जो भक्त भगवान शिवाचा आश्रय घेतो, ते त्यांचे रक्षण करतात आणि त्यांचे गाऱ्हाणे ऐकूण घेतात. ते भक्तांची हाक ऐकून ते सहज आनंदी होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. पौराणिक कथेनुसार, माली आणि सुमाली नावाचे राक्षस भगवान शंकरापर्यंत पोहोचले. त्यानंतर भगवान शिव क्रोधित झाले आणि भगवान सूर्यदेव यांना त्यांच्या क्रोधाचा बळी व्हावे लागले. भगवान शिवाने आपल्या शस्त्र त्रिशूळाने सूर्यदेवावर हल्ला केला होता, त्यामुळे संपूर्ण सृष्टी अंधकारमय झाली होती. काय होती ती घटना, जाणून घेऊया सविस्तर.

ब्रह्मवैवर्त पुराणात असा उल्लेख आहे की माली आणि सुमाली राक्षसांना तीव्र शारीरिक वेदना होत होत्या आणि सूर्यदेवाच्या अवज्ञामुळे ते मुक्त होऊ शकले नाहीत. दोघांनीही भगवान शंकराचा आश्रय घेण्याचे ठरवले. दोघांनीही भगवान शिवासमोर आपली व्यथा सांगितली आणि आपली तब्येत बरी न होण्याचे कारण सूर्यदेव असल्याचे सांगितले. यानंतर माली आणि सुमाली या राक्षसांची दुर्दशा ऐकून भगवान शिव व्याकुळ झाले, त्यामुळे ते क्रोधित झाले. त्यांनी तत्काळ सूर्यदेवावर त्रिशूळ हल्ला केला.

भगवान शिवाचा हल्ला कोण सहन करू शकेल? त्रिशूलाच्या हल्ल्यामुळे सूर्यदेव बेशुद्ध होऊन रथावरून खाली पडले आणि संपूर्ण सृष्टी अंधकारमय झाली. सूर्य देव कश्यप ऋषींचा पुत्र आहेत. जेव्हा कश्यप ऋषींना ब्रह्मांडातील अंधार आणि भगवान शंकराच्या हल्ल्याची माहिती मिळाली, तेव्हा ते संतप्त झाले. त्यांनी भगवान शिवाला आपल्या मुलाच्या स्थितीवर दुःखी होण्याचा शाप दिला. या शापामुळेच भगवान शंकरांनी गणेशाचा शिरच्छेद केला, असे म्हटले जाते.

जेव्हा भगवान शिवाचा राग शांत झाला, तेव्हा त्यांनी पाहिले की विश्व अंधारात आहे. त्यानंतर त्यांनी सूर्यदेवाला जीवनदान दिले. त्यानंतर जेव्हा सूर्यदेव शुद्धीवर आले, तेव्हा त्यांना वडिलांच्या शापाची माहिती मिळाली. ते दुःखी झाले, मग ब्रह्मदेवाने त्यांना समजावले. भगवान शिव, ब्रह्माजी, भगवान विष्णू, त्यांचे वडील कश्यप ऋषी यांनी त्यांना आशीर्वाद दिला. तेव्हा सूर्यदेव आपल्या रथावर आरूढ झाले आणि ब्रह्मांड प्रकाशित करू लागले.

भगवान ब्रह्मदेवाने दुःखापासून मुक्तीसाठी माली आणि सुमाली या राक्षसांना सूर्याची उपासना करण्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर ब्रह्मदेवाच्या सांगण्यानुसार माली-सुमालींनी सूर्यदेवाची उपासना केली आणि त्यांच्या उपासनेने प्रसन्न होऊन सूर्यदेवाने त्यांच्या सर्व शारीरिक समस्यांचा अंत केला.