Box Office Collection : ‘आर्टिकल 370’च्या व्यवसायात दुसऱ्या दिवशी आली तेजी, ‘क्रॅक’ची झाली बिकट अवस्था


कोणताही चित्रपट हिट होण्यात प्रेक्षकांची भूमिका सर्वात मोठी असते. 23 फेब्रुवारीला दोन चित्रपट थिएटरमध्ये दाखल झाले. यामी गौतमचा ‘आर्टिकल 370’ आणि विद्युत जामवालचा ‘क्रॅक’. या दोन्ही चित्रपटांनी प्रदर्शित होण्याआधीच बरीच चर्चा गोळा केली होती. एक ॲक्शन फिल्म आहे आणि दुसरी दहशतवादावर आधारित आहे. हे दोन्ही चित्रपट आता थिएटरमध्ये एकमेकांशी स्पर्धा करताना दिसत आहेत. दुसऱ्या दिवसाच्या चित्रपटांचे आकडे समोर आले आहेत.

यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईतही मोठी झेप पाहायला मिळाली. यामीच्या दमदार अभिनयाने लोकांना चित्रपट पाहण्यास भाग पाडले आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशीही ‘आर्टिकल 370’ने चांगली सुरुवात केली होती. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीच्या कमाईच्या आकड्यातील झेप या चित्रपटात काहीतरी खास आहे, हे सिद्ध झाले आहे. ‘आर्टिकल 370’ ने दुसऱ्या दिवशी 7.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. ही आकडेवारी सध्या प्राथमिक असून त्यात वाढ होऊ शकते.

यासह, ‘आर्टिकल 370’ चे दोन दिवसांचे एकूण कलेक्शन 13.4 कोटी झाले आहे. दरम्यान, विद्युत जामवालच्या ‘क्रॅक’बद्दल बोलायचे झाले, तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी ‘क्रॅक’च्या व्यवसायात घट झाली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला, तर विद्युतच्या चित्रपटाने 2.75 रुपये कमावले आहेत. ‘क्रॅक’ने पहिल्या दिवशी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘क्रॅक’चे आत्तापर्यंतचे कलेक्शन 7 कोटींवर पोहोचले आहे.

एकीकडे यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ चित्रपटाकडून निर्मात्यांच्या अपेक्षा वाढत आहेत. दुसरीकडे, विद्युतच्या क्रॅक चित्रपटामुळे निर्मात्यांची निराशा झाली आहे. ‘आर्टिकल 370’ विद्युतच्या चित्रपटावर पडदा टाकत असल्याचे दिसते. यामीचा चित्रपट दुसऱ्या दिवशीच खूप पुढे गेला आहे.