तुमच्या पगारातून का कापला जातो टॅक्स? जाणून घ्या संपूर्ण गणित


जानेवारी-मार्च हे महिने नोकरदारांसाठी त्रासदायक असतात. या तीन महिन्यांत, त्यांचा पगार अचानक कमी होतो, कारण बहुतेक कंपन्या या तीन महिन्यांत त्यांच्या पगारावर टॅक्स कापतात. काही कंपन्या हा टॅक्स आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांतच कापतात. पण प्रश्न असा आहे की तुमच्या पगारातून टॅक्स का कापला जातो, आयटीआर भरताना तुम्ही तो नंतर का भरू शकत नाही आणि त्याचे कॅल्कुलेशन कसे केले जाते?

कंपन्या किंवा नियोक्ते त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून जो टॅक्स कापतात त्याला TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड सोर्स म्हणतात. कंपन्या किंवा नियोक्ते हा टॅक्स दर महिन्याच्या पगारातून किंवा फक्त एका तिमाहीच्या पगारातून अनेक हप्त्यांमध्ये कापतात.

तुमच्या पगारानुसार ठरवला जातो टीडीएस
प्रत्येक कर्मचाऱ्याचा टीडीएस त्याच्या पगारावर अवलंबून असतो. त्यामुळे तुमच्या पगारातून किती टीडीएस कापला जाईल याचे कोणतेही निश्चित प्रमाण नाही. तथापि, ते तुमच्या पॅकेजमधून तुमच्या अंदाजे करपात्र उत्पन्नाच्या आधारावर मोजले जाते.

जर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची, HRA, गृहकर्जाची माहिती तुमच्या HR विभागाला वर्षाच्या सुरुवातीला दिली, तर तुमचे अंदाजे करपात्र उत्पन्न कमी होते आणि नंतर तुमच्या पगारातून कमी टॅक्स कापला जातो.

कसे केले जाते TDS चे कॅल्कुलेशन?
शेवटी, दरमहा तुमच्या पगारातून किती टीडीएस कापला जाईल, हे कसे मोजले जाते? तुम्ही तुमच्या एचआर विभागाला जी काही गुंतवणूक आणि कर व्यवस्थेची माहिती देता, कंपनीचा वित्त विभाग किंवा नियोक्ता तुमच्या करपात्र उत्पन्नावरील कराची गणना करतो. यानंतर, तो दरमहा तुमच्या पगारातून EMI प्रमाणेच कापला जातो.