राणी मुखर्जी आणि मनीष मल्होत्रावर का रागावला YRFचा माजी सहाय्यक? भर रस्त्यात केली शिवीगाळ


यशराज फिल्म्समध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करणारा अनुराग गोपाल पांडे भर रस्त्यात शिवीगाळ करताना दिसला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अनुराग अभिनेत्री राणी मुखर्जी आणि डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांच्यासाठी खूप अपशब्द वापरताना दिसत आहे. राणी मुखर्जी आणि मनीष सोबत, अनुराग देखील यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांच्यावर राग काढताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनुराग पांडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर पांढरी टोपी आणि हातात एक लहान बॅकपॅक घेऊन उभा आहे आणि तो मनीष मल्होत्राला संदेश देत आहे. अनुराग YRF टीमवर आणि विशेषतः राणी मुखर्जी आणि मनीष मल्होत्रा ​​यांच्यावर खूप संतापलेला दिसला. यावेळी त्याने या स्टार्सना शिवीगाळही केली. प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिस तेथे आले आणि अनुरागला दुकानातून बाहेर काढले, त्यानंतर प्रकरण संपले.

या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलायचे झाले, तर तिथे उपस्थित लोक म्हणतात, अनुराग मनीष मल्होत्राच्या दुकानात आला आणि देणगी देण्याबाबत बोलू लागला. मग तो अश्लील बोलू लागला आणि काही वेळाने त्याने महिलांबद्दल खूप वाईट कमेंट्स केल्या. त्यानंतर त्याने जोरजोरात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने YRF कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा तसेच आदित्य चोप्राची पत्नी राणी मुखर्जी यांच्याविरुद्ध अपशब्द वापरले. अखेर मनीष मल्होत्राच्या टीमने पोलिसांना बोलावले आणि त्यांनी त्याला दुकानातून बाहेर काढले. मात्र, अनुरागने हे का केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.