महेश भट्ट असे काय काय म्हणाले ? ज्यामुळे मुंबई सोडून निघालेल्या मनोज बाजपेयींनी बदलला आपला निर्णय


मनोज बाजपेयी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे. पण, त्याच्या आयुष्यात एक वेळ अशी आली, जेव्हा त्यांना सर्व काही सोडून मुंबईतून जायचे होते. त्यादरम्यान त्यांची महेश भट्ट यांच्याशी भेट झाली. त्यावेळी महेश भट्ट यांनी मनोज बाजपेयी यांना असा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांचे आयुष्यच बदलून गेले.

मनोज बाजपेयी निराश होऊन मुंबई सोडण्याच्या तयारीत असताना त्यांनी महेश भट्ट यांची भेट घेतली. एका मुलाखतीत जुन्या दिवसांची आठवण करून देताना मनोज बाजपेयी म्हणाले, त्या दिवसांत मी कामाच्या शोधात होतो आणि थिएटरमध्ये इतके काम करूनही मला काम मिळत नव्हते. त्यावेळी माझ्याकडे फारसे पैसेही नव्हते. दरम्यान, मला ‘स्वाभिमान’ या मालिकेच्या प्रॉडक्शन हाऊसकडून फोन आला होता, पण मला टीव्हीवर काम करायचे नव्हते.

संवादादरम्यान मनोज बाजपेयी यांनी पुढे सांगितले की, त्यांना वाटत होते की ते चांगला अभिनेता नाही. त्यादरम्यान त्यांची महेश भट्ट यांच्याशी भेट झाली. मनोज यांनी आपले म्हणणे पूर्ण करताना सांगितले की, त्यावेळी मी महेश भट्ट यांची भेट घेतली आणि माझी स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील आणि मी अशा प्रकारे शहर सोडू नये, असा विश्वास त्यांनी (महेश भट्ट) दिला होता. महेश भट्ट यांनी त्यांना स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगितले. मला तुमच्यामध्ये नसीरुद्दीन शाह दिसतो, असेही ते म्हणाले.

मनोज बाजपेयी यांनी ‘स्वाभिमान’ या मालिकेतून अभिनयाला सुरुवात केली. पण, त्यांना या मालिकेत काम करण्याची कधीच इच्छा नव्हती. त्यांच्या मित्रांनी त्यांना जबरदस्तीने प्रॉडक्शन हाऊसमध्ये नेले. मात्र, आता त्या मालिकेत काम करण्याचा निर्णय ते योग्य मानतात. त्यांच्या मते, या मालिकेने त्यांना ‘सत्या’ चित्रपटासाठी चांगले प्रशिक्षण दिले.